Home नांदेड श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. १३ भाविक जखमी.

श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. १३ भाविक जखमी.

197
0

राजेंद्र पाटील राऊत

श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात.

१३ भाविक जखमी.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर

वझरा येथील शे.फरीद बाबाच्या दर्शनास जात असतांना एम.एच.०४,एफ.जे.०५५१ या क्रमांकाचे चार चाकी वाहन (टाटा छोटा हाती ) दि.१० ऑक्टो.रोजी स.९ वा.चे सुमारास पलटले.त्यात आर्णी येथील १३ भाविक जखमी झालेत.सर्व जखमी भाविकांना ग्रामीण रूग्णालयात भर्ती केले असता,प्राथमिक उपचारां नंतर ६ जणांना यवतमाळला स्थलांतरीत केले आहे.

दत्तशिखर घाटात वाहन चालकाला घाटाचा अंदाज आला नसल्याने सदरचे वाहन पलटले. त्यात स.इरफान स.मनसूर (२८),शे.मदरोद्दिन शे.नज़रोद्दिन (७०),रहीमखान शे.रज्जाक (३०),फय्याज शे.मुनाफ (१३),मुजीमखान नूरखान (४५),शारीक शब्बिर शे.(२८) या भाविकांवर डॉ.उदय काण् णव,दत्ता पालटवार,एल.जी.मेंडके,निलेश बीलापेकर,परमेश्वर जुडे,गजानन भोपाळे,आव्हाड,शिंदे,पोखरे,सोनकांबळे,खराटे,ललिता मुंडेकार यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना यवतमाळला हलविण्यात आले.स.फारुख स.शेख (२६),शे.साबीर शे.मस्तान (४५),रूखसूना बेगम सुभेदार खान (४०),शे.अहेमद शे.हनीफ (५२),शे.खाजा शे.अजीज (३५), साजीद मलनस हरून (३९),अयान पठाण अमन (११ ) हे किरकोळ जखमी असून त्यांचेवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण? २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या? परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे काय….
Next articleसटाणा तालुक्यात लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन …!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here