Home नाशिक डॉ योगेश जी डुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनसगाव शिवारातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण–

डॉ योगेश जी डुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनसगाव शिवारातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण–

74
0

आशाताई बच्छाव

IMG_20240122_063640.jpg

डॉ योगेश जी डुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनसगाव शिवारातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण–

जय बाबाजी गुरुकुल खेडे येथे सत्कार समारंभ व स्नेह भोजनाचा कार्यक्रम उत्साहात

रामभाऊ आवारे निफाड

वाढदिवसाला हार, तुरे व इतर अवाढव्य खर्चाला फाटा देत आपणही समाजाचे देणे लागतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वनसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर चे संचालक डॉ योगेश रामदास डुंबरे यांनी जन्मदिनाच्या निमित्ताने वनसगाव परिसरातील सर्व मंदिरांना बाकडे देऊन गावाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करत असलेला प्रयत्न निश्चितच भावी पिढीसाठी आदर्शवत
असल्याचे मनोगत वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर यांनी केले आहे.
डॉक्टर योगेश जी डुंबरे यांच्या जन्मदिनानिमित्त वनसगाव सह परिसरातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण सोहळ्याचा प्रारंभ वनसगाव- उगाव शिवा वरील सखाहरी कारभारी शिंदे यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवेश्वर महादेव मंदिरापासून मंदिरात पूजन, आरती करून तसेच डॉक्टर योगेश डुंबरे यांचे औक्षण करून केक कापून उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी जेष्ठ वारकरी सखाहरी कारभारी शिंदे,मा सरपंच उन्मेष डुंबरे, सरपंच महेश केदारे,मा सरपंच किरण शिंदे, प्रल्हाद डुंबरे, डॉ रावसाहेब जाधव, शरद भाऊसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भिमराव सोनवणे, दत्तात्रय कारभारी शिंदे,रामा शिंदे,नारायण शिंदे,शरद एकनाथ शिंदे, जगन्नाथ करेकर बाजीराव कापडी, नामदेव शिंदे दिलीप शिंदे, गणेश शिंदे, योगेश डुंबरे, धनंजय काका जाधव, योगेश शिंदे तसेच डॉ योगेश डुंबरे मित्र परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाकडे लोकार्पण सोहळा कार्यक्रम पुढील प्रमाणे करण्यात आला

१) सखाहारी कारभारी शिंदे वस्तीवरील– विश्वेश्वर महादेव मंदिर १ बाकडे — शुभहस्ते सखाहारी कारभारी शिंदे व नामदेव दत्तात्रय शिंदे.
२) अशोक निवृत्ती जाधव उगाव- वनसगाव शिव रस्ता म्हसोबा मंदिर १ बाकडे — शुभहस्ते अशोक निवृत्ती जाधव व दिनकर किसन जाधव.
३) मारुती त्रंबक जाधव उगाव -वनसगाव शिव रस्ता मसोबा मंदिर १ बाकडे — शुभ हस्ते मारुती त्र्यंबक जाधव व नामदेव माधव डुंबरे.
४) बाळासाहेब सोपान शिंदे येथील महादेव मंदिर व कृष्णानंद गिरीजी महाराज समाधी १ बाकडे – शुभहस्ते काशिनाथ भिकाजी शिंदे व नवनाथ कचरू शिंदे.
५) कामधेनु माता मंदिर व दत्त मंदिर खळवाडी २ बाकडे- शुभ हस्ते गोविंद अंबादास घाडगे व पोलीस पाटील संतोष मारुती अस्वले.
६) सप्तशृंगी माता मंदिर वनसगाव जुने सोसायटी रस्ता १ बाकडे – शुभहस्ते संजय भुरकुडे व चिंधु दुगु शिंदे.
७) वनसगाव मुंजाबा फाटा मुंजाबा मंदिर १ बाकडे शुभ हस्ते– दत्तात्रय रामदास शिंदे व मारुती विष्णू निरभवणे.
८) वनसगाव पाटी चा मळा दत्त मंदिर १ बाकडे –शुभ असते उत्तम पगार व रतन मुरलीधर शिंदे.
९) वनसगाव गोजरे मळा महादेव मंदिर १ बाकडे– शुभहस्ते एकनाथ माधव शिंदे व बाबाजी दगु शिंदे.
१०) म्हसोबा मंदिर- शंकर किसन कापडी कारवाडी १ बाकडे – शुभहस्ते विश्वनाथ शंकर कापडी व किसन कापडी.
११) वनसगाव -कोटमगाव मधला रोड दत्तमंदिर १ बाकडे – शुभहस्ते संपत कारभारी शिंदे.
आदी परिसरातील मंदिरांना बाकडे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सायंकाळी जय बाबाजी गुरुकुल खेडे आश्रम शाळेत सत्कार समारंभ व स्नेह बोलण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई जगताप, भाजप नेत्या अमृताताई पवार ,ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी आदींसह पंचक्रोशीतील सर्व हितचिंतक मित्रपरिवार उपस्थित होते.

Previous articleअमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत तयारी.
Next articleपरळी वैजनाथ नगरीत भव्य शोभायात्रा मुंडे बंधू भगिनी सह हजारो रामभक्त भक्तिरसात न्हाले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here