Home बीड परळी वैजनाथ नगरीत भव्य शोभायात्रा मुंडे बंधू भगिनी सह हजारो रामभक्त भक्तिरसात...

परळी वैजनाथ नगरीत भव्य शोभायात्रा मुंडे बंधू भगिनी सह हजारो रामभक्त भक्तिरसात न्हाले

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240122_064056.jpg

परळी वैजनाथ नगरीत भव्य शोभायात्रा मुंडे बंधू भगिनी सह हजारो रामभक्त भक्तिरसात न्हाले

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी वैजनाथ दि:२१ महाराष्ट्रातील पंचम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जाणारी परळी प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत 22 जानेवारी रोजी अयोध्यात होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त परळीत भव्य दिव्य अशी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.या शोभायात्रेत लहान थोर अशा हजारोच्या संख्येने जनसमुदाय रामभक्त उपस्थित होते. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय या घोषणाने परळी शहर दणाणून गेले होते व येथील वातावरण आनंदमय, भक्तिमय झाले होते व येथील राम भक्त रामभक्तीत नाहून गेले होते प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद निर्माण झालेला दिसून आला व विशेष उपस्थितीत म्हणजे मुंडे बंधू भगिनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री धनंजय मुंडे व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव श्री.पंकजाताई मुंडे यांची पण उपस्थिती होती. ही भव्य शोभायात्रा मिरवणूक प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर येथून नेहरू चौक तळ परीसर, राणी लक्ष्मीबाई टावर चौक, मोंढा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने निघाली असून शहरातील या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. परळी शहरातील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन या शुभ कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन पुष्पहार अर्पण करून मा.ना.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली व सर्व उपस्थितांनी शुभ आशीर्वाद घेतले आहे व या मिरवणुकीचा शेवट करण्यात आला.

Previous articleडॉ योगेश जी डुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनसगाव शिवारातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण–
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here