Home कोल्हापूर कोल्हापूरात राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

कोल्हापूरात राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

112
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूरात राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड

( मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर : शहरात गंजीमाळ परिसरात एका राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून आतील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी सायंकाळी टिंबर मार्केटमधील गंजीमाळ परिसरात घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून, एकूण आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंजीमाळ येथील बंडू प्रल्हाद लोंढे यांच्या मालकीच्या जागेत एका राजकीय पक्षाचे शाखा कार्यालय आहे. त्या परिसरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची उठबस आहे. शनिवारी सायंकाळी परिसरातून ओंकार जाधव, रोहित जाधव आणि अन्य चार-पाच जण दुचाकीचा सायलेन्सर काढून वेगाने पळवीत होते.
त्यावेळी शंकर लोंढे यांनी त्यांना अडवून, रस्त्यात लहान मुले फिरतात. मोठ्याने आवाज करीत गाडी कशाला फिरवता असे विचारले. त्यावेळी त्या दोघांनी तू आम्हाला विचारणारा कोण, असा उलट प्रश्न विचारून शंकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी लोंढे यांच्या बंद कार्यालयाचा दरवाजा तोडून आतील एलसीडी, फॉल सिलिंग, दोन फॅन व इतर साहित्याची तोडफोड करून ५० हजारांचे नुकसान केले, तसेच कार्यालयातील चांदीची मूर्ती चोरून नेल्याचे बंडू लोंढे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून जुना राजवाडा पोलिसांनी ओंकार जाधव, रोहित जाधव (रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट) यांच्यासह अनोळखी पाच जणांवर गुन्हा नोंदविला.

Previous articleक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
Next articleबागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे बंडु काका बच्छाव बागलाण वाचवा जनतेची आर्क हाक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here