Home सामाजिक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

133
0

राजेंद्र पाटील राऊत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज ११   एप्रिल      राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले (१८२७) यांची 190 वी जयंती त्यानिमित्त त्यांच्या कार्यास व कृतिस विनम्र अभिवादन व आपणास लक्ष लक्ष शुभेछ्या….

भारतातील बहुजन समाज त्यांचा हक्कांसाठी, स्त्रीशिक्षण,समता यासाठी महान कार्य करणाऱ्या राष्ट्रपिता म.ज्योतिराव फूले यांचा जयंती निमित्त त्यांचा बद्दल थोडक्यात..
– जन्म ११ एप्रिल १८२७.
– १८४८ साली शिक्षण चळवळीस प्रारंभ,चार वर्षात २० शाळा सुरु केल्या.
– त्या काळात बहुजन समाजाला व स्त्रियांना मोफत शिक्षण दिले.
-विज्ञानवादी,प्रयत्नवादी,अनिष्ठप्रथा विरोधी,स्वर्ग-नरक संकल्पना अमान्य.शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत.
– बालविवाहाला विरोध तर विधवा विवाहाला प्रोत्साहान.
– चूल व मूल या निर्दयी व्यवस्थेवर प्रहार करून सवित्रीमाईना शिक्षण देऊन महिलांना शिक्षणाची प्रेरणा दिली.
– १जाने.१८४८ रोजी स्त्रियांना शिक्षण देण्यात देशात सर्वप्रथम सुरुवात केली व सवित्रीमाईचा शिक्षणातून आत्मविश्वास वाढवला.
– त्या कालीन भारतीय शिक्षण आयोग ‘हंटर’ आयोगास प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यास धारेवर धरले.
– स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते.
– “गुलामगिरी” या ग्रंथातुनगरीब बहुजन समाजाबद्दल तळमळ मांडली आहे
– बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी विपुल प्रमाणत लिखाण केले, “शिवाजी महाराजांवर पोवाडा” ,”गुलामगिरी ग्रंथ”, “शेतकऱ्यांचा आसूड” हे शेतकऱ्यानं विषयी पुस्तक, ब्राह्मणांची कसब सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक, देशातील पहिले नाटक “तृतीयरत्न”. अशा साहित्या मुळेच देशात परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली.
– आज्ञान ,अंधश्रद्धा ,विधवा विवाह, भ्रूणहत्या,अस्पृश्यता,अत्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्नसाठी आयुष्यभर लढा.
– “सत्यशोधक समाज-संस्थापक”, “शिवजयंतीची जनक”,शेतकरी संघटना, कामगार संघटना,ई सार्वजनिक कार्यात सहभागी.
“आभाळाने नाकारलेल्या पंखांना उड्डाणाचे सामर्य्थे देणाऱ्या हे महामानवा… तुमचे विचार आमचे आचार होवोत” !
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा.

Previous articleगतवर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना रूग्णांची तयारी ठेवा , पालकमंत्री सतेज पाटील
Next articleकोल्हापूरात राजकीय पक्षाच्या शाखा कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here