Home गडचिरोली !! जिल्ह्यात प्रथमतः मेडिकल कॉलेज उभारण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली घोषणा...

!! जिल्ह्यात प्रथमतः मेडिकल कॉलेज उभारण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली घोषणा !!

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0043.jpg

!! जिल्ह्यात प्रथमतः मेडिकल कॉलेज उभारण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली घोषणा !!

!!डॉ देवराव होळी यांचे अभिनंदन!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे प्रथम प्राधान्याने मंजूर करावे त्यानंतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चा विचार करण्यात यावा अशी वारंवार मागणी करणारे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १०० टक्के होईल याबाबत आमदार महोदयांना आश्वस्त केले

गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी मागील काही महिन्यापासून सातत्याने मंत्र्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आग्रह करीत होते. त्यांनी जिल्ह्यात प्रथम मेडिकल कॉलेजची आवश्यकता का आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यासाठी आमदार डॉ देवराव होळी यांना सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी सुध्दा पाठिंबा दिला याबाबत त्यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. गडचिरोली येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यापूर्वी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. आपल्या मागणीची नक्कीच दखल घेतल्या जाईल असे आश्वासन दिले होते , परंतु आज जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या जिल्ह्यातील पूर परिस्थिती आढावा बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांनी मेडिकल कॉलेज उभारणी गडचिरोली जिल्ह्यात करण्यात येईल अशी घोषणा केली व आमदार डॉ देवराव होळी यांच्या पाठपुराव्या बद्दल प्रशंसा केली या यावेळी आमदार महोदयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तमाम जिल्हा वासिय जनतेच्या वतीने आभार मानले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सदर मुद्द्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून देणारे पत्रकार बांधव यांचे आभार मानले व सदर मागणी पूर्तता बद्दल गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे जनतेच्या वतीने आभार मानले जात आहे

Previous articleमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा..
Next articleनांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा निर्धार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here