Home विदर्भ अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240122_131557.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक

गोंदिया (संजीव भांबोरे) येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची बैठक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय धृततारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष भार्गव वाघमारे यांच्या उपस्थितीत 21 जानेवारी 2024 ला दुपारी 12 वाजता घेण्यात आली .या सभेत गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश राऊलकर, गोंदिया जिल्हा कोषाध्यक्षपदी किशोर वलगाये, गोंदिया जिल्हा सहसचिव पदी देविदास बलबुद्धे ,सडक अर्जुनी तालुका उपाध्यक्ष पदी रामकृष्ण कुरसुंगे यांची नियुक्ती करण्यात आली .या सभेत मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष भार्गव वाघमारे यांनी सांगितले की निराधार योजनेचे मानधन ,युडीआय डी बरेच दिव्यांगांना मिळाले नाहीत त्यामुळे आपल्याला एकत्रित येऊन न्याय देण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश राहुल कर यांनी केले. यावेळी प्रदीप सरोदे ,नरेश कुंभरे, नरेश भालाधरे, बबलू घरडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपरळी वैजनाथ नगरीत भव्य शोभायात्रा मुंडे बंधू भगिनी सह हजारो रामभक्त भक्तिरसात न्हाले
Next articleघरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास बंद घरात चोरी : ड्रीमलँड सिटी मधील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here