Home वाशिम घरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास बंद घरात चोरी : ड्रीमलँड...

घरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास बंद घरात चोरी : ड्रीमलँड सिटी मधील घटना

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240122_131951.jpg

घरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास
बंद घरात चोरी : ड्रीमलँड सिटी मधील घटना
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ):- शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरात वास्तव्यास असलेले माजी बांधकाम सभापती (नगर परिषद ) गौतम सोनोने यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख ३ लाख ८५ हजार व २.५० लाख रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. अज्ञात चोरट्या विरुद्ध शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
ड्रीमलँड सिटी मध्ये वास्तव्यास असलेले सोनोने कुटुंब २० जानेवारीला महत्वाच्या कामानिमित्त अकोला येथे घराला कुलूप लावून गेले होते. अज्ञात चोरट्यानी घरावर पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजा व सुरक्षा ग्रिल असे दोन्ही कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील लॉकर चे कुलूप तोडून त्यामधील रोख ३ लाख ८५ हजार व सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार असा एकूण साडे सहा लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला.
सोनोने कटुंब अकोला येथून आपले कौटुंबिक कामकाज आटोपून २१ जानेवारीला संध्याकाळी ७.३० वाजता परत आले. घराचे गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला असता मुख्य दरवाजा व ग्रिल चे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. गौतम आणि त्यांची पत्नी अनिता यांनी घरामध्ये प्रवेश करून
बघितले असता बेडरूम मधील कपाट तोडून त्यातील साहित्य बाहेर काढून बेडवर अस्ताव्यस्त ठेवलेले आढळून आले. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने त्यामधून लंपास केल्याचे लक्षात येताच शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली.
ठाणेदार गजानन धंदर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुष्पलता वाघ, प्रशांत वाढणकर, उमेश देशमुख, डॉग स्कॉड, फिंगर प्रिंटचे संदीप सरोदे व पथक, डिटेक्शन ब्रांचं चे पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, जमादार श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, महादेव भिमटे, उमेश चव्हाण, राहुल चव्हाण यांचा समावेश असलेला पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

बॉक्स घेणे
“ती” रक्कम पगार अणि पेट्रोल पंपची
माजी बांधकाम सभापती गौतम सोनोने हे सध्या त्यांच्या बहिणीचा असलेला मालेगाव रोडवरील नायरा पेट्रोल पंप चे काम बघतात. पेट्रोल विक्री मधून आलेली दोन दिवसाची ३.५० लाख रुपये रोख रक्कम होती. तर त्यांच्या पत्नी अनिता ह्या एका खासगी शाळेवर अध्यापनाचे कार्य करतात. त्याचा त्यांना ३५ हजार रुपये पगार मिळाला होता. अशी एकूण ३.८५ लाख रोख रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती.

बंद घरातच होतात चोऱ्या
अलीकडच्या काळात बंद घर असले की चोरटे त्यावर पाळत ठेवून घरात प्रवेश करतात. अणि ऐवज लंपास करतात. विनायक नगर मध्ये मागील महिन्यात पत्रकार अभिजित संगवई अणि पोलिस कर्मचारी संतोष चव्हाण हे दोन्ही कुटुंब घर बंद करून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या दोन्ही घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेचा अद्याप तपास लागला नाही. परंतु सर्व नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरात कुणीतरी जवळचा व्यक्ती ठेवूनच बाहेरगावी जावे. घराला कुलूप नसले तर चोरटे अशा घरात प्रवेश करत नाहीत. नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासन नेहमी करत असते. परंतु नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. ही खेदाची बाब आहे

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक
Next articleघरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास बंद घरात चोरी : ड्रीमलँड सिटी मधील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here