राजेंद्र पाटील राऊत
सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) जिल्हा परिषद ब्राम्हणगाव गटाच्या सदस्या सौ. लताताई विलास बच्छाव व डॉ. विलास दादा बच्छाव यांच्या अथक प्रयत्नाने अजमिर सौन्दाणे गावासाठी उद्या दिनांक ८ मे २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक २०० लस उपलब्ध झाल्या असून ४५ वर्षापुढील बंधू भगिनी यांनी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून नियमांचे उल्लंघन न करता येतांना मास्क लावून लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ. लताताई विलास बच्छाव यांनी केले आहे. तसेच १८ ते ४५ च्या आतील वयोगटातील नोंदणीकृत सदस्यांना पण लसीकरनाचा लवकरच लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना पण ब्राम्हणगाव येथे लसीकरणाचा लवकरच लाभ मिळनार आहे .वेळोवेळी साबणाने हात धुवा ,सॅनिटायजरचा वापर करा, वाआपले कुटुंब सुरक्षित ठेवा.
महत्वाचे…
🛑बागलाण तालुक्यातील १८ वर्षे ते ४४ वर्षे वयासाठी लसीकरण उद्या शनिवार दिनांक ८ मे रोजी पासून ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणगाव येथे सुरू करण्यात येत आहे.
तरी लसीकरणाचा फायदा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा.
सदर लसीकरणासाठी जी व्यक्ती ऑनलाईन नोंदणी आपल्या मोबाईल वरुन करतील व तारीख ,वेळ निवडून आधी अपॉइंटमेंट घेतील त्यांनाच सदर ठिकाणी लसीकरण केले जाईल.
सोबत येताना ऑनलाइन अपलोड केलेले आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर डॉक्युमेंट्स सोबत घेऊन येणे.
– डॉ.हेमंत अहिरराव
तालुका आरोग्य अधिकारी
सटाणा