Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात येत्या ७ दिवसासाठी कडक लाॕकडाऊन

सोलापूर जिल्ह्यात येत्या ७ दिवसासाठी कडक लाॕकडाऊन

101
0

राजेंद्र पाटील राऊत

सोलापूर जिल्ह्यात येत्या ७ दिवसासाठी कडक लाॕकडाऊन
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
……………..
भाजीपाल्यासह किराणा दुकाने ही बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्याचे आदेश
………………
सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या ८ मे रात्री आठ वाजल्यापासून १५ मे सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवाची दुकाने बंद राहणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री पञकार परिषद घेवुन ही माहिती दिली यावेळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर तसेच जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी उपस्थितीत होते.
सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. काही सेवा चालु असल्याने लोक बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने कडक लाॕकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले मेडीकल दुकाने आणि आरोग्य सेवा वगळता इतर गोष्टी साठी निर्बंध कडक केले आहेत.त्यामुळे भाजी पाला विक्रीसह किराणा दुकाने हाॕटेल,माॕल, बिअर दुकाने वाईनशाॕप बेकरी,आडत दुकाने,खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत तर कृषी दुकाने सुरु राहतील त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here