Home नांदेड जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0050.jpg

जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड :- आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.आय.भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्र व आयुष विभागाच्योवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमांचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसिकर यांचे हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर योगप्रशिक्षक श्रीमती राणी दळवी यांनी विविध योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगा दिनाचे धडे दिले. तसेच सर्वांनी नियमित योग साधनेवर भर द्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या.

या कार्यक्रमास जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.जव्वाद खान, शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रेणुकादास मैड, डॉ. कैलास चव्हाण, एल टी तुमोड, रानोळकर, छाया कदम, अपर्णा जाधव, अर्चना भोसले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णकार सदाशिव यांनी केले. आभार प्रदर्शन गायकवाड बालाजी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी परिश्रम घेतले.

Previous articleहमखास नोकरीची संधी देणाऱ्या तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरु.
Next articleश्री गुरूग्रंथसाहिब भवन येथे भव्य प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here