Home विदर्भ खासदार.अशोक नेते यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

खासदार.अशोक नेते यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

258

राजेंद्र पाटील राऊत

खासदार.अशोक नेते यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन

चामोर्शी: – दि. १ मार्च, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि. 1 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त मार्कंडा देव येथे जाऊन मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले व पूजा- अर्चा करून आरती केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, मार्कंडा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, राकेश राचमलवार, स्वीयसहाय्यक रवींद्र भांडेकर, जयराम चलाख, चामोर्शी चे तहसीलदार, पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांच्या हस्ते खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
Next articleपोलीस स्टेशन अनसिंग यांची अवैध जनावरे वाहतुक विरुद्ध धडक कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.