Home विदर्भ पोलीस स्टेशन अनसिंग यांची अवैध जनावरे वाहतुक विरुद्ध धडक कारवाई

पोलीस स्टेशन अनसिंग यांची अवैध जनावरे वाहतुक विरुद्ध धडक कारवाई

80
0

राजेंद्र पाटील राऊत

पोलीस स्टेशन अनसिंग यांची अवैध जनावरे वाहतुक विरुद्ध धडक कारवाई
मंगरुळपीर (रितेश गाडेकर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):- मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासून वाशिम जिल्ह्यातील अवैध जनावरांची वाहतूक विरुद्ध धडक मोहीम हाती घेऊन वाशिम जिल्ह्यातील अवैध प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मा पोलीस अधिक्षक साहेब श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात परत एकदा वाशीम जिल्ह्यातील अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या इसमा विरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. सदर मोहिमे अंतर्गत दि.02/03/2022 रोजी पोलीस स्टेशन अनसिंग येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अनसिंग ते वारला रोडवर एक टेम्पो क्र. MH.38 X 0851 या वाहनातून 06 गोवश जनावरे (गोरे) अवैधरित्याघेऊन जात असतांना मिळुन आला त्यांला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलम 279 भादवी व कलम 11 (1) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून वाहन व जनावरे असा एकूण 5,60,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भांमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर श्री यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अनसिंगचे ठाणेदार श्री प्रशांत कावरे यांच्या नेतृत्वात तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र ताले, पोकॉ माणिक जुगाडे व मधुकर देसाई यांनी केली सदर कार्यवाही मुळे अनसिंग शहरातील जनतेमध्ये समाधान व्यक्तकरण्यात येत आहे.

Previous articleखासदार.अशोक नेते यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन
Next articleमुगाव ता. नायगाव येथे महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here