Home नांदेड प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप...

प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप शिबीर

201

राजेंद्र पाटील राऊत

🌿प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप शिबीर🌿

▪️1 जूनच्या शिबिरासाठी जिल्हा प्रशासन व बँकांची जय्यत तयारी
▪️पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकांच्या प्रतिनिधी मार्फत गावोगावी संपर्क
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड, :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे प्रतिनिधी बैठका घेऊन संपर्क साधत आहेत. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून येत्या 1 जून रोजी 86 महसूल मंडळातील शंभर गावात पीक कर्ज वाटप शिबीर आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाअंतर्गत आयोजित या उपक्रमात पीक कर्जाचे 400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधून आढावा घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत समन्वय साधून पीक कर्ज योजनेबाबत गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी 1 जूनच्या या शिबिराबाबत अधिकाधिक जागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

23 बँकांच्या माध्यमातून येत्या 1 जून रोजी जिल्ह्यात 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन पूर्वी निर्धारीत केले होते. जिल्ह्याचा विस्तार आणि महसूल मंडळांची संख्या, मोठ्या गावांची संख्या लक्षात घेऊन आता हे शिबीर शंभर गावात करण्याचे नियोजन केले आहे. यात पीक कर्जाचे 400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईल अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

Previous articleवडगाव शिवारात अनोळखी मृतदेह आढळला;वडनेर पोलिसांचे आवाहन
Next articleसखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.