Home नांदेड मुगाव ता. नायगाव येथे महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड

मुगाव ता. नायगाव येथे महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड

130
0

राजेंद्र पाटील राऊत

मुगाव ता. नायगाव येथे महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज)
मुगाव ता.नायगाव येथील प्रसिध्द महादेव यात्रे निमित्त अस्सल रांगडा मैदानी खेळ कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अंतीम विजेत्या व पराभूत पैलवानांचा सन्मान करून कै.हाणमंतराव पाटील भिलवंडे यांच्या स्मरणार्थ नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या शुभहस्ते प्रथम बक्षीस देण्यात आले.
यावेळी मुगावचे सरपंच प्रतिनिधी नारायण पाटील, कृ.उ.बा.समिती संचालक बालाजी पाटील ताटे, व्यंकटराव पाटील लघुळे,श्रीराम पाटील श्रीरामे,मष्णा पाटील,माधवराव कंधारे,ओड समाज प्रांतसचीव नंदकिशोर टोकलवाड, तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल कांबळे,दादाराव पाटील रोडे यांच्यासह पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here