Home नांदेड क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा बु. ता....

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा बु. ता. मुखेड येथे निरोप समारंभ तसेच पालक मेळावा उत्साहात संपन्न.

219

राजेंद्र पाटील राऊत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरा बु. ता. मुखेड येथे निरोप समारंभ तसेच पालक मेळावा उत्साहात संपन्न.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

क्रांतीसुर्य म. ज्यो.फुले मा.उच्च मा.वि.राजुरा ता. मुखेड जि.नादेड येथे दि.2 Feb 2022 रोजी इयत्ता बारावी कला, विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, तसेच पालक मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री माकणे साहेब (गटशिक्षणाधिकारी प.स.मुखेड),श्री प्रा.उतमराव भोपाळकर,श्री आयेनीले सर(कोषाध्यक्ष) प्राचार्य श्री रानशेवार सर सरपंच, उपसरपंच,पोलिस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय श्रीरामजी पाटील राजुरकर साहेब आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात म.फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यांमध्ये सन मार्च 2021परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने सर्व पाहूणे, मार्गदर्शक, अध्यक्ष साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य यांनी अतिशय सखोल अशी संस्थेची गुणवत्ता,विकास,या विषयावर आपले प्रास्ताविक मांडले.सर्व मार्गदर्शक अध्यक्ष साहेब यांनी संस्था प्रगती पथावर आणण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल असे सांगितले तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Previous articleमुगाव ता. नायगाव येथे महादेव यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड
Next articleमातोश्री भिमाई व्याख्यानमाला ही विचार चैतन्याचा जागर आहे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.