Home वाशिम उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनिमित्त शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनिमित्त शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात

16
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_205911.jpg

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनिमित्त शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १३ मार्च रोजी वाशिम येथे होणार्‍या जाहीर सभेच्या नियोजनासाठी बुधवार, ६ मार्च रोजी जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी यांच्या सिव्हील लाईनस्थित जिजाऊ निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे वाशिम यवतमाळ समन्वयक उद्धव कदम तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सहसंपर्क प्रमुख सुधीर कव्हर, वाशिम यवतमाळ संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजानन देशमुख यांची उपस्थिती होती. आगामी लोेकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुरेश मापारी यांची नियुक्ती होताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाशिम येथे दौरा निश्चित झाला आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जाहीर सभेच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत सभेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, माणिक देशमुख, नागोराव ठेंगडे, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, रामदास सुर्वे, उद्धव गोडे, विधानसभा समन्वयक विवेक नाकाडे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, राजाभैय्या पवार, नामदेवराव हजारे, सचिन परळीकर, केशवराव इंगोले, पांडूरंग पांढरे, तालुकाप्रमुख नारायण आरु, बालाजी वानखेडे, अशोकराव अंभोरे, कैलास गोरे, राजु रंगभाळ, विश्वनाथ सानप, चंद्रशेखर देशमुख, केशवराव इंगोले, अजाबराव देशमुख, युवासेनेचे जिल्हासचिव गजानन ठेंगडे, तालुकाप्रमुख मनोज चौधरी, सुशील भिमजीवाणी, आशिष इंगोले यांच्यासह  शिवसेनेचे विधानसभा समन्वयक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, वाहतूक सेना, जिल्हापरिषद सदस्य, नगरपरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here