Home उतर महाराष्ट्र राहुरीत विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा उत्साहात संपन्न

राहुरीत विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा उत्साहात संपन्न

59
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230806-064206_WhatsApp.jpg

राहुरी | भरत नजन : उंबरे येथील घटनेच्या निषेधार्थ व लव्ह जिहाद विरोधात देशभरात कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले होते. राहुरीतील वायएमसीए मैदानावर हिंदू समाज मोठ्या संख्येने घोषणा देत दाखल झाला. या हिंदू जन आक्रोश मोर्चास स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.तालुक्यातील ग्रामीण भागातून हिंदू समाज भगव्या टोप्या व हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे ४५ हजार ते ५० हजार हिंदूंची संख्या असणारा शुक्लेश्‍वर चौकातून छत्रपती शिवाजी चौक ते शनिमंदिर चौक मार्गे जुन्या ग्रामीण रूग्णालयासमोर या मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपिठावर आ. नितेश राणे, श्रीसंत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज, हर्षदा ठाकूर, एकलव्य संघटनेचे योगेश सुर्यवंशी, श्रीराम सेनेचे सागर बेग यांनी आपल्या भाषणातून घटनेचा चांगला खरपूस समाचार घेतला.नितेश राणे बोलताना म्हणाले, देशाच्या इतिहासात हिंदूंनी कधीच प्रथम दंगल घडविली नसून हिंदू समाज कधीच कुण्याच्या अंगावर जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे, कायद्यांचे पालन करतो. हिंदूकडून अन्य धर्माच्या लोकांना कधीच त्रास होत नाही. प्रत्येकाने आपला धर्म संभाळावा व आम्हाला हिंदू म्हणून या देशात सुखाने जगू द्यावे.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहुरी शहरातील काही धार्मिक स्थळांच्या आसपास पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच या मोर्चासाठी राहुरी पोलीसांबरोबर अनेक शिघ्र कृती दलाचे विशेष पथकेही तैनात करण्यात आले होते. मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेऊन होते. तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे सभास्थळी करडी नजर ठेऊन होते तसेच मोर्चामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राहुरी शहर जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. या हिंदू जन आक्रोश मोर्च्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, अक्षय कर्डिले, राजूभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, नंदकुमार तनपुरे, चाचा तनपुरे, नरेंद्र शिंदे, महेश उदावंत, संतोष आघाव, अशोक तनपुरे, रोहित नालकर, महेंद्र शेळके, राजेंद्र लबडे, संदिप गाडे, शरद तनपुरे, किशोर भोंगळ आदींसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिनाथ महाराज दुशिंग यांनी तर सुत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले.

Previous articleकिरोडा घाटात रस्ता अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Next articleमहात्मा फुले हायस्कूल नाईकनगर चे मुख्याध्यापक भारत कलवले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here