राजेंद्र पाटील राऊत
पद्मविभूषण पुरस्कार ,पद्मभूषण पुरस्कार व पद्मश्री पुरस्काराची प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली घोषणा
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजेच आज वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार –
प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेशाम खेमका(मरणोत्तर)
पद्मभूषण पुरस्कार –
सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद
पद्मश्री पुरस्कार –
बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतवासीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! हा भारतीयत्वाच्या अभिमानाचा उत्सव आहे
जो आपल्या सर्वांना एकत्र बांधतो. प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस त्या महान वीरांच्या स्मरणाचाही एक प्रसंग आहे, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवले आणि त्यासाठी लढण्यासाठी देशवासीयांचा उत्साह जागवला. दोन दिवसांपूर्वी २३ रोजी जानेवारी, आपण सर्व देशवासियांनी ‘जय-हिंद’ ची घोषणा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण केले.
स्वातंत्र्यासाठीचे त्यांचे कार्य आणि भारताला गौरवशाली बनवण्यासाठीची त्यांची महत्वकांक्षा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
आपण करोना महामारी विरोधात असाधारण दृढनिश्चय आणि कार्यक्षमता दाखवली आहे. असंख्य कुटुंबे भयानक संकटातून गेली आहेत. आपल्या सामूहिक वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण दिलासा एवढाच की अनेकांचे प्राण वाचवता आले. कोविड महामारीचा प्रभाव अजूनही व्यापक आहे, त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे आणि आपल्या बचावात कोणतीही हलगर्जीपणा करू नये. आत्तापर्यंत आपण घेतलेली खबरदारी यापुढे घ्यावी लागणार आहे. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी दिलेल्या खबरदारीचे पालन करणे, हा आज प्रत्येक देशवासीयांचा राष्ट्रधर्म बनला आहे. हे संकट दूर होत नाही तोपर्यंत हा राष्ट्रधर्म पाळायचा आहे. ” असंही यावेळी राष्ट्रपती म्हणाले.




