Home मुंबई एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहातून बाहेर काढले..! ठाकरे सरकार जबाबदार म्हणत आणखीन एक एस...

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहातून बाहेर काढले..! ठाकरे सरकार जबाबदार म्हणत आणखीन एक एस टी कामगाराची आत्महत्या…!

200
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहातून बाहेर काढले..! ठाकरे सरकार जबाबदार म्हणत आणखीन एक एस टी कामगाराची आत्महत्या…!
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

३५ एस टी कामगारांच्या बळी गेले,त्याची जबाबदारी मंत्री अनील परब घेणार की ठाकरे सरकार… येत्या निवणुकीमध्ये एस टी कामगारांचा दरात मतासाठी उभे राहायचे आहे याचे भान ठेवा. आर्यन खान साठी सगळे मंत्री मंडळ, सिनेसृष्टीत धावून आली, अजून ते नवाब मलिक पत्रकार परिषद घेत आहेत. त्याला कोणती कारवाई नाही,आणि स्वतःच्या हाकासाठी लढणाऱ्या एस टी कामगारांना नियम अटी डाखून निलंबन, आत्महत्या करायला प्रवृत्त करणार का तुम्ही, जरा सबुरीने घ्या माणुसकी सामजिक भान ठेऊन एस टी कामगारांच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा.
मुंबईतील परळ, मुंबई सेन्ट्रल, परळ आगारातील एसटीच्या चालक-वाहकांना मंगळवारी रात्री विश्रामकक्षातून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून कक्षांना कुलूप लावल्याचा प्रकार घडला. हीच कारवाई महानगरातील अन्य आगारांतही झाली.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्यासह पदपथावरच रात्र काढावी लागल्याचे एका वाहकाने सांगितले.आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहातून बाहेर काढून टाळं ठोकण्यात येत आहे.
मुंबईतील नालासोपारा आगारात हा प्रकार घडला. एसटी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन मागे घेत नसल्याचं दिसल्यावर सरकारनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. त्यानुसार नालासोपारा एस.टी. स्टँडवरी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठीच्या विश्रांती गृहाला टाळे ठोकण्यात येत असून तिथं मुक्कामी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
कर्मचारी मागण्यांवर ठाम प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी मागण्यांवरून मागे हटणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आपापल्या पेट्या सांभाळत त्यांनी आगाराबाहेर आंदोलन सुरू ठेवलं आहे.
अनेक एसटी कर्मचारी हे बाहेर गावाहून नालासोपाऱ्यात आले आहेत. परत जाण्यापूर्वीच आंदोलन तीव्र झाल्यामुळे ते या जागी अडकून पडले आहेत. मात्र अशा कर्मचाऱ्यांना आता विश्रामगृहातून बाहेर काढलं जात असून सुरक्षा रक्षकांकडून टाळं ठोकण्यात येत आहे.
यामुळे आंदोलन संपेपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दबावाला बळी न पडण्याचा इशारा महामंडळाकडून एकीकडे सबुरीची भाषा आणि दुसरीकडे कारवाई अशी भूमिका घेतली जात असल्याबद्दल कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत. मात्र काहीही झालं तरी मागण्या मान्य केल्याशिवाय संपातून माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर संपकरी एसटी कर्मचारी ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे.

सर्व कर्मचारी आपलेच असून कोरोना काळातून राज्य सावरत असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभिर्यानं विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने कारवाईत वाढ के ली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित के लेल्या कर्मचाऱ्यांची एकू ण संख्या ९१८ झाली आहे. सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर, आटपाडी या आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्यातील एसटी सेवा ठप्प असल्याने महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने आगारातून खासगी प्रवासी बसगाड्या, शालेय बस आणि अन्य खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here