Home अमरावती डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार चे काम काम सुरू करा, पांढरी खानमपूर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार चे काम काम सुरू करा, पांढरी खानमपूर येथील बौद्ध समाज बांधवांचा विभागीय आयुक्त असे तासभर चर्चा.

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_205253.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार चे काम काम सुरू करा, पांढरी खानमपूर येथील बौद्ध समाज बांधवांचा विभागीय आयुक्त असे तासभर चर्चा.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .
अमरावती. (अंजनगाव सुर्जी).
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील गाव सोडलेले शेकडो बौद्ध बांधव गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. त्यावेळी विभागीय आयुक्ताशी तासभर चर्चा झाली; परंतु या चर्चेमध्ये कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावर बौद्ध समाजा बांधवांनी ठिया आंदोलन सुरुवात केली आहे. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पांढरी खानमपूर येथील गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. मागील महिनाभरापासून हा वाद पेटला असून ६ मातीला बौद्ध समाज बांधवांनी प्रवेश दाराच्या
मागणीसाठी आपल्या मुलं-बाळासाह तसेच गुरेढोरांना सोबत घेत गाव सोडले. गुरुवारी हे सर्व बौद्ध बांधवांनी अमरावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येवुन विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा काढला. यावेळी गावातील काही ग्रामपंचायत सदस्य, डॉ कमलताई गवई तसेच इतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्ताची तासभर चर्चा केली. परंतु त्यानंतरही कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने आंदोलन कर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रवेशद्वाराचा बांधकामाची सुरवात होत नाही तोपर्यंत आमच्या गावी पुन्हा परतणार नसल्याचा भूमिकेवर बौद्ध समाज बांधव थांब राहतील असा निर्णय घेतला. भक्त बांधवांच्या मागणीबाबत आयुक्तांनी तीन दिवसाच्या अवधी मागितला. विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्याशी झालेल्या चर्चा मध्ये त्यांनी गावातील नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्या मिळेल सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या आश्वासन देत तोपर्यंत पुन्हा गावात प्रयत्न करण्याची बौद्ध समाज बांधवांनाविनंती केली. गावामध्ये पूर्ण संरक्षण आणि तसेच संबंधित यात्रिसिटी दाखल असलेल्या आरोपी कमलेश पटेल व १८ जणांना अटक करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. परंतु बौद्ध बांधव प्रवीण दादांचे कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत पुन्हा गावात न परत जाण्याच्या भूमिकेवर ठाम असताना झाला नाही.

Previous articleजिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजता मार्गदर्शन केंद्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
Next articleउद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनिमित्त शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here