Home Breaking News कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य

118
0

🛑 कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : ⭕ कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत करण्यात आली आहे. २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधनांचा समावेश. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे बिझिनेस ॲन्ड कम्युनिकेशन हेड प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे.

याव्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना ही स्वछता आणि आरोग्यविषयक साधने मदतीच्या स्वरुपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. कोविड-१९ विषाणूच्या विरोधात लढतांना आतापर्यंत राज्यातील जनतेने तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती-संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

त्यांच्या या सहकार्याच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणू विरोधात लढतांना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.⭕

Previous article
Next articleपीएमपी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here