• Home
  • पीएमपी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

पीएमपी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

🛑 पीएमपी सुरू करण्याची प्रवाशांची माग🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले शहर पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउनच्या नियमात शिथिलता दिल्यानंतर मुख्य बाजारपेठा, खासगी, सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे प्रवाशांकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.

सर्वसामान्यांसाठी पीएमपीची सेवा बंद आहे. यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेेचा वापर करणार्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणार्‍या पीएमपीच्या बस 24 मार्च पासून अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत. लॉकडाउनच्या चौथ्या टप्पानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा, मंडई, खासगी, सरकारी कार्यालय उघडण्यास सुरूवात झाली आहे. पीएमपीवर अवलंबून असणार्‍यांची गैरसोय होत आहे. योग्य खबरदारी घेऊन पीएमपीची सेवा सुरू करावी अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात काही मार्गांवर बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बस मध्ये 21 प्रवासी, मास्क अनिवार्य, एका आसनावर एकच जण, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील प्रवेश मिळणार नाही. याप्रकारचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. पुणे शहरात पीएमपीला वाहतुकीची परवानगी दिल्यास वाहतूक सुरू करण्यास तयार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड भागात काही मार्गांवर 80 बसच्या माध्यमतून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र त्या मार्गावर प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरात प्रशासनाने परवानगी दिल्यास प्रतिबंधित भाग वगळता बस सुरू करण्यात येईल. पीएमपी प्रशासन बस सुरू करण्यासाठी तयार आहे. प्रवाशांकडून सुद्धा बस कधी सुरू होणार याबाबात विचारणा करण्यात येत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment