Home कोरोना ब्रेकिंग राज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ जणांचा मृत्यू

राज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ जणांचा मृत्यू

130
0

🛑 राज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ जणांचा मृत्यू 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 जून : ⭕ धारावी कंट्रोलमध्ये, तर माहिम-दादर आऊट ऑफ कंट्रोल

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील अधिकार्‍यांनी आपले सारे लक्ष केवळ आणि केवळ धारावीकडेच केंद्रीत केले. परंतु धारावीतील जनतेची विशेष काळजी घेताना, कुठेतरी येथील महापालिकेच्या अधिकार्‍यांचा माहिम व दादर या विभागांकडे दुर्लक्ष झालेला आहे. सुरुवातील धारावीचा आकडा वाढत असला तरी सध्या येथील रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत दैनंदिन आढळून येणार्‍या रुग्णांमध्ये धारावीपेक्षा आता दादर-माहिम खूप पुढे आहे. त्यामुळे धारावीला कंट्रोलमध्ये आणताना माहिम-दादर हा परिसर आऊट ऑफ कंट्रोल होणार नाही ना, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील अधिकार्‍यांनी आपले सारे लक्ष केवळ आणि केवळ धारावीकडेच केंद्रीत केले. परंतु धारावीतील जनतेची विशेष काळजी घेताना, कुठेतरी येथील महापालिकेच्या अधिकार्‍यांचा माहिम व दादर या विभागांकडे दुर्लक्ष झालेला आहे. सुरुवातील धारावीचा आकडा वाढत असला तरी सध्या येथील रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत दैनंदिन आढळून येणार्‍या रुग्णांमध्ये धारावीपेक्षा आता दादर-माहिम खूप पुढे आहे. त्यामुळे धारावीला कंट्रोलमध्ये आणताना माहिम-दादर हा परिसर आऊट ऑफ कंट्रोल होणार नाही ना, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

माहिम-दादरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही मंगळवारपर्यंत ८८६ एवढी होती. यामध्ये माहिमची रुग्ण संख्या ५४९ एवढी तर दादरची रुग्ण संख्या ३३७ एवढी आहे. आज धारावीच्या एकूण संख्येपेक्षा माहिम-दादरची संख्या निम्म्यापेक्षा कमी असली तरी अन्य महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या तुलनेत अधिकच आहे. विशेष म्हणजे दादर आणि माहिम या विधानसभेत जेमतेम पाच टक्के झोपडपट्टी आहे. उर्वरीत सर्व इमारती व चाळीच आहेत. माहिममध्ये पहिला रुग्ण हा वरळीतील जिजामाता नगर येथील मटण विक्रेता होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. परंतु एमएमसी रोडपासून सुरु झालेल्या संसर्ग माहिम कापड बाजार, कॉजवे, मच्छिमार नगर, पोलिस वसाहत, एमरार्ड कोर्ट, आझाद नगर, मच्छिमार नगर सागर सम्राट, वांझेवाडी,मोगल लेन, कमला रामन नगर, मनमाला टँक रोड आदी ठिकाणी पसरला गेला. माहिममधील प्रमुख हॉटस्पॉट ठरला आहे ता पोलिस कॉलनीचा. त्यानंतर एमरार्ड कोर्टमध्ये सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत.

तर दादरमध्ये उपेंद्र नगर, मिरांडा चाळ , भवानी शंकर रोड, रानडे मार्ग, कासारवाडी, पोलिस वसाहत, वीर सावरकर मंडई टिळक भवन परिसर, आदी भागांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यासंपूर्ण विभागात भाजपची एकमेव नगरसेविका वगळता सर्व शिवसेनेचे नगरसेवक आहेत. मात्र, संपूर्ण विभागात रुग्णवाहिका आणि शव वाहिनी यांचीच प्रमुख समस्या होती. माहिममध्ये आढळून येणार्‍या रुग्णांना वांद्रे भाभा किंवा शीव रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ज्या ज्या प्रकारे सुचना केल्या जात होत्या,त्यानुसार प्रशासन विचार करत कार्यवाही करत होते. पण धारावीकडे अधिक लक्ष असले तरी माहिम आणि दादरकडे कधीच लक्ष कमी केले नव्हते,असे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या प्रभागात एकूण २७० करोना बाधित रुग्ण आहेत. लॉकडाऊन उठताच ते अशाप्रकारे रस्त्यावर येतात, की मग वाटते ज्या लोकांना स्वत:च्या जीवाची फिकीर नाही, त्यांच्यासाठी मग आम्ही जीव धोक्यात का घालावा.
-मिलिंद वैद्य, नगरसेवक, शिवसेना.

माझ्या प्रभागात कमी रुग्ण आहेत. परंतु कुठे तरीही प्रशासनाचे सर्व लक्ष धारावीकडे असल्याने तसेच एकाच वैद्यकीय अधिकार्‍याला सर्व ठिकाणी लक्ष देता येत नसल्याने दादर-माहिम करता स्वतंत्र विभागीय वैद्यकीय अधिकारी असावा,अशी माझी मागणी होती.
-विशाखा राऊत,नगरसेविका, शिवसेना.⭕

Previous articleपीएमपी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
Next articleकरोनाचा धोका: वटपौर्णिमा घरातच करण्यास प्राधान्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here