• Home
  • करोनाचा धोका: वटपौर्णिमा घरातच करण्यास प्राधान्य

करोनाचा धोका: वटपौर्णिमा घरातच करण्यास प्राधान्य

🛑 करोनाचा धोका: वटपौर्णिमा घरातच करण्यास प्राधान्य 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 जून : ⭕करोनाच्या संकटात वटपौर्णिमा आली असल्याने महिला वर्ग घरातच पूजा करण्यास प्राधान्य देणार आहे. वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून किंवा तुळशीला प्रतिक मानून वटपौर्णिमा साजरी करण्याकडे कल असणार आहे. पर्यावरणी दिनी आलेली ही वटपौर्णिमा म्हणूनच विशेष ठरणार आहे.

लॉकडाउनमध्ये वटपौर्णिमा आल्याने पूजा कशी करायची, पूजेचे साहित्य मिळणार का, अशा अनेक शंका महिलांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. पण त्यावर अनेकींनी मार्ग शोधला आहे. घरच्या घरी अगदी फांदीही न आणता वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्धार काही महिलांनी केला आहे. यावर पर्याय म्हणून वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून त्याची पूजा करणार असल्याचे काही महिलांनी सांगितले, तर काहींनी तुळशीची मनोभावे पूजा करणार असल्याचे सांगितले.

शहराच्या आरोग्यासाठी हे झाड बहुगुणी आहे. शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे, परंतु हे धुलिकण शोषून हवा शुद्धीकरणासाठी या झाडांचा मोठा हातभार लागतो. झाडाच्या पानांमागे बघितले तर मोठ्या प्रमाणात धुलिकण चिकटून बसलेले असल्याचे दिसून येते. आरोग्याच्या दृष्टीने ही झाड बहुमोल असून त्याची पाने, फळे, फांद्या, पारंब्यांचा आयुर्वेदात मोठा उपयोग आहे.

– डॉ. अजित गोखले, पर्यावरणतज्ज्ञ

आमच्या परिसरात वडाचे झाड आहे. दरवर्षी वटवृक्षाची पूजा करतो. पण करोनाच्या भीतीमुळे घरीच पूजा करणार आहे. झाडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करण्याचे मला मान्य नाही. त्यापेक्षा माझ्या घरात कुंडीत लावलेल्या तुळशीची प्रतिकात्मक पूजा करण्यास प्राधान्य देणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment