• Home
  • बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

 

🛑 बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 जून : ⭕ करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. प्रवासासाठी पोलिसांकडून मिळणारा ई पास असणे बंधनकारक आहे.

करोनाच्या संकटात संधीचा गैरफायदा घेणाऱ्यांचा सुळसुळाट अद्याप सुरूच आहे. मुंबईतील नागरिकांना ठाणे पोलिस आयुक्तालयातून दुसऱ्या जिल्ह्यात बोगस ई पास देणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकासह दोघांना बुधवारी अटक केली. या टोळीने अनेकांना बोगस ई पास दिल्याचे उघड झाले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. प्रवासासाठी पोलिसांकडून मिळणारा ई पास असणे बंधनकारक आहे. अशातच परळ व्हिलेज येथे राहणारी तीन कुटुंबे ई पासद्वारे ठाणे जिल्ह्यातून कोल्हापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या ई पासचे क्यूआर कोड स्कॅन केले असता, सर्व पास बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे युनिट १चे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनंत शिंदे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जगताप यांच्या पथकाने तपास करीत ठाणे येथून विकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मालक विकास महाजन आणि त्याचा साथीदार अनिल यशवंते या दोघांना अटक केली. या दोघांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी काहींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment