Home मुंबई दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम: बच्चू कडू

दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम: बच्चू कडू

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0020.jpg

दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम: बच्चू कडू
भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
माजी मंत्री प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चु कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदासाठी अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला असून अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामध्ये बच्चू कडू यांचे सुद्धा नाव प्राधान्यज्ञेि घेतले जाते. आता पुन्हा एका बच्चू कडू यांनी मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली असून नाराजी नाट्य रंगणार का या चर्चांना उधान आले आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीनिमित्ताने प्रहार व मेस्टाचे उमेदवार डॉ. संजय तायडे पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली असून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, “दिव्यांग मंत्रालयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षापासून बोलत होतो, परंतु मंत्रालय झाले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या सहा महिन्यात मंत्रालय स्थापन केले, दिव्यांग मंत्रालयासाठी 20 वर्षापासून संघर्ष केला. अनेक गुन्हे दाखल झालेत. दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे बच्चु कडू यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here