Home मुंबई राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0024.jpg

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत
भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यांना पदावर राहायचे असल्यास ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यत राहू शकतात. मात्र भगत सिंह कोश्यारी यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यपालांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यपाल हे सातत्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, असे खासगीत सांगत आहेत. माझी तब्येतही आता साथ देत नाही आहे, असे ते सांगत आहेत. मात्र राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितला, असं कुणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यपालांना जर पदावर राहायचं असेल, तर ते पाच वर्षे इथं राहू शकतात. कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. पण राज्यपालांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं आहे की, आता मला या पदावर राहणं जमणार नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा कुठल्या वादाशी संबंध आहे असं मला वाटत नाही.
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल जेव्हा पद सोडतील त्यापूर्वी ते सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दुसरं असं आहे की, राज्यपाल हेसुद्धा एक व्यक्ती आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी जर पंतप्रधानांचा सल्ला घेतला असेल, तर त्यात मला कही गैर वाटत नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही आरोप केले. राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला जो काही स्वैराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करून दिला नाही. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न त्यांना टार्गेट करून करण्यात आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

Previous articleशिंदे – फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा ?
Next articleदिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम: बच्चू कडू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here