Home Breaking News शिंदे – फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा ?

शिंदे – फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा ?

103
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0040.jpg

शिंदे – फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा ?

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सेवेतून मुक्त करण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात पडद्याआड काही घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारावरुनही शिंदे गट आणि भाजपात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. त्यात, पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे, या भेटीत नेमकं काय ठरलंय, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नक्की मानायचा का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.
दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री
अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. केंद्रीय सहकार मंत्री
अमित शाह यांनी बोलाविलेल्या सहकार
क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र सहकार क्षेत्रासोबतच इतर सर्वच चर्चा होतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इतर चर्चांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद
सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हे
विषय महत्त्वाचे आहेत. दरम्यान, “राज्यपालांच्या इच्छेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here