Home जळगाव महाराजांचा सांगावा आलायं… यायला लागतंय…

महाराजांचा सांगावा आलायं… यायला लागतंय…

105
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0014.jpg

महाराजांचा सांगावा आलायं…
यायला लागतंय…

जळगांव ब्यूरो चीफ, नरेंद्र पाटील.

जळगांव शहरात नवी पेठ गणेश मंडळातर्फे अनोखी शिव कालीन आरास …
नवीपेठ गणेश मंडळ, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सादर करत आहे… श्री. पंकजजी दुसाने (प्रसिध्द शस्त्र संग्राहक व अभ्यासक) स्पार्क फाऊंडेशन, अमळनेर यांचे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे अबोल साक्षीदार
शिवकालीन शस्त्रास्त्र दर्शन आरास ज्या शस्त्रांनी स्वराज्याचे रक्षण केले, शत्रुला पळते केले अशा पवित्र शस्त्रांचे दर्शन.

५० महोत्सवी खान्देशचा राजा |
यंदाच्या गणेशोत्सवाच्या आरासीचे मुख्या आर्कषण म्हणजे शिवकालीन युध्दांमध्ये वापरलेल्या अस्सल (ओरिजनल) तलवारींचे अनेक प्रकार, कु-हाडी, कटयारी, सुरे, भाले, दांडपट्टा, वाघनखं, चिलखत, बिछवे तसेच अनेक प्रकारचे दुर्मिळ शस्त्रास्त्रे पाहण्याचा लाभ जळगाव शहरातील इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी व तमाम जनतेसाठी उपलब्ध करत असुन सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

दि.२०/०९/२०२३ वार बुधवार ते दि. २७/०९/२०२३ बुधवार पर्यंत.
सकाळी 90.00 ते ५.०० (खास शालेयविद्यार्थ्यांसाठी)
संध्या. ६.०० ते रात्री 90.00 पर्यंत (सर्वांसाठी खुले)

या सुवर्णसंधीचा सर्व भाविक लाभ घेऊ शकतात ती दिनांक व वेळ मंडळाने निर्धारित केलेली असून जास्तीत जास्त शिवप्रेमी गणेश भक्तांनी या आरासला भेट देऊन शिवकालीन शस्त्रांचा अनुभव घ्यावा, असे निवेदन मंडळा तर्फे करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here