Home माझं गाव माझं गा-हाणं लासलगाव जवळील खडक माळे गाव धरणात तरुणाने गमावला जीव.

लासलगाव जवळील खडक माळे गाव धरणात तरुणाने गमावला जीव.

79
0

राजेंद्र पाटील राऊत

लासलगाव जवळील खडक माळे गाव धरणात तरुणाने गमावला जीव.

प्रतिनिधी .प्रवीण अहिरराव./युवा मराठा न्युज नेटवर्क

लासलगाव. पोहता येत नसल्याने भलतेच धाडस करणाऱ्या युवकाला लासलगाव जवळील खडक माळेगाव धरणात आपला जीव गमवावा लागला .अंधार पडल्यामुळे या युवकाचा शोध रात्री उशिरापर्यंत न लागल्याने शोध थांबवण्यात आला .परंतु रविवारी लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी पुन्हा सकाळी शर्यतीचे प्रयत्न करत शोध घेतला असता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात प्रशासनाने विकेंड लॉक डाऊन जाहीर केलेले असतानाही काही युवकांनी धाडस करत निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले होते. यातील सागर शरद शेजवळ या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडू लागला ,सोबत असलेल्या युवकांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले .या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी सागर चा पाण्यामध्ये शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.
दुसऱ्या दिवशी लासलगाव स्विमिंग ग्रुपचे सदस्य धरणाची माहिती असल्याने शोध कार्यात मदत केली .मृतदेह बाहेर काढण्यासाठी .डॉक्टर .अनिल बोराडे .विलास चव्हाणके ,संदीप अग्रवाल ,दत्ता साप्ते ,यांनी प्रयत्न केले . यावेळी खडक माळेगाव चे सरपंच दत्ता काका रायते ,लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,ग्रामसेवक वैशाली राजोळे हे उपस्थित होते.

Previous articleटाटांनी पुन्हा करुन दाखवलं…! रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात 🛑
Next articleकोरोनाच्या ७ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here