Home मुंबई मोदी सरकारची नवी वेतन संहिता : आठवड्यात ४ दिवस काम,वेतन घटणार?

मोदी सरकारची नवी वेतन संहिता : आठवड्यात ४ दिवस काम,वेतन घटणार?

135
0

राजेंद्र पाटील राऊत

मोदी सरकारची नवी वेतन संहिता : आठवड्यात ४ दिवस काम,वेतन घटणार?

ठाणे (अंकुश पवार – प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकार घेण्याच्या तयारीत आहे. १ ऑक्टोंबर पासून केंद्र सरकार कडून नवी वेतन संहिता लागू होण्याची शक्यता आहे. नवी वेतन संहिता लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा पर्याय मिळू शकतो.पण हा पर्याय निवडनाऱ्या कर्मचाऱ्यांना ९ तास का १२ तास काम करावे लागणार आहे.

परंतु कामाचे १२ तास या मुद्द्याला विविध कामगार संघटनांनी विरोध केला आहे. ४ दिवसाचा कामाचा पर्याय कंपनी आणि कर्मचारी यांच्या सहमतीने निवडावा लागेल. या नव्या वेतन सहितेने देशातील कष्टकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

हातात येणारे वेतन घटणार
नव्या वेतन संहितेत भत्यांना वेतनाच्या ५०% मर्यादा घालण्यात आली आहे, त्यामुळे मूळ वेतन वाढून पीएफ मधील कपात वाढेल.
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर ही जादा द्यावा लागेल त्यामुळे हातात येणारा पागरमध्ये घट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here