Home नांदेड मुखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. रयत क्रांती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करून...

मुखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. रयत क्रांती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

88
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. रयत क्रांती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज मुखेड येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने पिक विमा कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले
शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिक विमा कंपनी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली रयत संघटनेने तहसीलदार व कृषि अधिकाऱ्याकडे मागणी
शेतकऱ्याचे भावनांशी खेळाल रयत क्रांती संघटनेशी गाठ आहे

मुखेड तालुक्यात ईफको टोकीयो पिक विमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवुन मुखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज धरणे आंदोलन करुन तहसिलदार व कृषि अधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ईफको टोकीयो पिक विमा कंपनीच्या पंचनामे करणार्‍या थर्ड पार्टीच्या मुलांची पाञता तपासुन शासन नियमांचे सर्रास ऊल्लघंन झाले कारण शासन नियमानुसार नुकसानीचे मुल्याकंन निश्चीत करण्यासाठी विहीत अनुभव व शैक्षणिक पाञतेच्या निकषानुसार पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी.यामध्ये कोणत्याही विषयाची पदविका व दोन वर्षाचा अनुभव किंवा कृषि व सलंग्न विषयाची पदवी व 1 वर्षाचा अनुभव अपेक्षीत असताना त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कृषि/फलोत्पादने/कृषि विस्तार शाखेचे अधिकारी,सेवानिवृत्त बँक अधिकारी ज्यांना पिक कर्ज वाटपाचा अनुभव आहे.असे मुले निवडावयाची असताना पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या मर्जीतल्या नातलगाची निवड करुन शासनाच्या नियमाच्या ऊल्लघंन केल्या प्रकरणी कार्यवाही व्हावी.व पिक विमा कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली पाञता तपासण्यात यावी.कारण अनुभव नसल्याने व शासन नियमाप्रमाणे पर्यवेक्षक नसल्याने शेतकर्‍यांचे पिकांचे प्रचंड नुकसान होवुन पण त्यांच्या चुकीमुळै पिकविम्याच्या लाभापासुन वंचीत राहण्याची भिती वाटत आहे.
मुखेड तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व ढगफुटीने बेजार असताना पिक विमा कंपनी शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळत असुन मुखेड तालुक्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकर्‍यांच्या 25% पेक्षा जास्त शेतकर्‍यांची तक्रारी आल्याने शासन निर्णयानुसार सर्व मंडळे बाधीत क्षेञ म्हणुन सरसकट पिक विम्याचा लाभ द्या अशी मागणी रयत |क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.
ईफको टोकीयो पिक विमा कंपनी तालुका प्रतिनिधीचे मनमानी कारभार थांबवुन पिक विमा कंपनीच्या मुलांना पंचनाम्यासाठी पैसे देवु नये असे आवाहन सर्व सामजीक संघटनेकडुन केल्याने ईनकम बंद झालेल्या तालुका प्रतिनीधीने पंचनामे थांबवुन पंचनामे न करण्याची धमकी देण्याच्या नैतीक अधिकार कुणी दिला यामुळै शासकीय यंञणेकडुन शेतकर्‍यांचे पंचनामे सुरु करा
नैसर्गिक आप्पती मध्ये पंचनाम्यासाठी थर्ड पार्टी कंञाट मध्ये अनुभवी मुले पाठवा व काम केलेले कर्मचाही यांचे शेक्षणिक पार्तता व अनुभव तपासण्यात यावा कारण थर्ड पार्टीने पाठवलेली मुले प्रशिक्षीत व शेतीसंबधी ज्ञान नसल्याने शासन निर्णयानुसार शासनाचे ग्रामसेवक,तलाठी,कृषि सहाय्यक हे विमा कंपनीच्या प्रतिनीधी सोबत पंचनाम्याला आलेच पाहीजे
ईफको टोकीयो पिक विमा कंपनीने कंञाट दिलेल्या रक्षिता कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करुन
जिल्ह्यातील सर्व थर्ड पार्टीच्या कंञाटदार व त्यांचे कर्मचारी व विमा कंपनीच्या प्रतिनीधीची चौकशी करण्यात यावी.
जिल्हाभरातील सर्व तालुका प्रतिनीधी व थर्ड पार्टी कंञाटदारांची व त्यांच्या कर्मचार्‍यांची नैसर्गिक आपत्ती मध्ये पंचनामे झालेल्या काळातले फोनचे सिडीआर मागवावेत व मॅसेज Whatsapp चँट ची माहिती तपासावी यामुळे खुप मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य जे.बि.कांबळे,बालाजीराव वडजे,व्यकंट पाटील इंगळे,रमाकांत पाटील जाहुरकर,वैभव पाटील राजुरकर,योगेश पाटील जांभळीकर,माधव पाटील खदगावे,रामदास वाघमारे,पंढरी कांबळे,नागेश शिंदे,बालाजी राजुरवाड,नवनाथ पाटील तारदडकर,शिवाजी इंगळे,रणजीत कदम,माधव घाटे,व्यकंट इंगळे,बालाजी इंगळे,राहुल देशमुख,बजरंग हिवराळे,निशिकांत हिवराळे,यासह शेकडो शेतकरी ऊपस्थितीत होते.यानंतर नायब तहसिलदार महेश हांडे व प्रभारी तालुका कृषि अधिकारी बिर्‍हाडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here