Home नांदेड इफको टोकीयो पिक विमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवा अन्यथा रयत क्रांती संघटना...

इफको टोकीयो पिक विमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवा अन्यथा रयत क्रांती संघटना करणार जिल्हाभर आंदोलन बालाजी पाटील ढोसणे यांचा इशारा.

327

राजेंद्र पाटील राऊत

इफको टोकीयो पिक विमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवा अन्यथा रयत क्रांती संघटना करणार जिल्हाभर आंदोलन बालाजी पाटील ढोसणे यांचा इशारा.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज सोमवारी 11 वाजता मा.तहसिलदार साहेब,मा.तालुका कृषि अधिकारी साहेबांना पिकविमा कंपनी संर्दभात व सरसकट पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन द्यावयाचे असुन जास्तीत जास्त शेतकरी मायबापांनी आपल्या हक्काचा पिक विम्यासाठी तहसील कार्यालयात यावे.

अतिवृष्टी व ढगफुटी 7 तारखेला झाली व शेतकर्‍यांनी पिक नुकसान झाल्याची माहीती कळवुन पिक विमा कंपनी पंचनामे न करण्याची ताकीद देत असेल तर मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या 25% आगाऊ रक्कमेसह पिक विमा कंपनीवर आपल्या अधिकाराचा वापर करुन कंपनीवर कार्यवाही करावी व 100 % नुकसान ग्रहीत धरुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तात्काळ खात्यावर वर्ग करण्याचे ईफको टोकीयोला आदेश काढावेत

ईफको टोकीयो पिक विमा कंपनीच्या पंचनामे करणार्‍या थर्ड पार्टीच्या मुलांची पाञता तपासुन शासन नियमांचे सर्रास ऊल्लघंन झाले कारण शासन नियमानुसार नुकसानीचे मुल्याकंन निश्चीत करण्यासाठी विहीत अनुभव व शैक्षणिक पाञतेच्या निकषानुसार पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी.यामध्ये कोणत्याही विषयाची पदविका व दोन वर्षाचा अनुभव किंवा कृषि व सलंग्न विषयाची पदवी व 1 वर्षाचा अनुभव अपेक्षीत असताना त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कृषि/फलोत्पादने/कृषि विस्तार शाखेचे अधिकारी,सेवानिवृत्त बँक अधिकारी ज्यांना पिक कर्ज वाटपाचा अनुभव आहे.असे मुले निवडावयाची असताना पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या मर्जीतल्या नातलगाची निवड करुन शासनाच्या नियमाच्या ऊल्लघंन केल्या प्रकरणी कार्यवाही व्हावी.व पिक विमा कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली पाञता तपासण्यात यावी.कारण अनुभव नसल्याने व शासन नियमाप्रमाणे पर्यवेक्षक नसल्याने शेतकर्‍यांचे पिकांचे प्रचंड नुकसान होवुन पण त्यांच्या चुकीमुळै पिकविम्याच्या लाभापासुन वंचीत राहण्याची भिती वाटत आहे.

मुखेड तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व ढगफुटीने बेजार असताना पिक विमा कंपनी शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळत असुन मुखेड तालुक्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकर्‍यांच्या 25% पेक्षा जास्त शेतकर्‍यांची तक्रारी आल्याने शासन निर्णयानुसार सर्व मंडळे बाधीत क्षेञ म्हणुन सरसकट पिक विम्याचा लाभ द्या रयत क्रांती संघटनेचे बालाजी पाटील ढोसणे यांची मा.तहसिलदाराकडे ऊद्या शेतकर्‍यांना घेवुन करणार मागणी

इफको टोकीयो पिक विमा कंपनी तालुका प्रतिनिधीचे मनमानी कारभार थांबवुन पिक विमा कंपनीच्या मुलांना पंचनाम्यासाठी पैसे देवु नये असे आवाहन सर्व सामजीक संघटनेकडुन केल्याने ईनकम बंद झालेल्या तालुका प्रतिनीधीने पंचनामे थांबवुन पंचनामे न करण्याची धमकी देण्याच्या नैतीक अधिकार कुणी दिला यामुळै शासकीय यंञणेकडुन शेतकर्‍यांचे पंचनामे सुरु करा

नैसर्गिक आप्पती मध्ये पंचनाम्यासाठी थर्ड पार्टी कंञाट मध्ये अनुभवी मुले पाठवा व काम केलेले कर्मचाही यांचे शेक्षणिक पार्तता व अनुभव तपासण्यात यावा कारण थर्ड पार्टीने पाठवलेली मुले प्रशिक्षीत व शेतीसंबधी ज्ञान नसल्याने शासन निर्णयानुसार शासनाचे ग्रामसेवक,तलाठी,कृषि सहाय्यक हे विमा कंपनीच्या प्रतिनीधी सोबत पंचनाम्याला आलेच पाहीजे

ईफको टोकीयो पिक विमा कंपनीने कंञाट दिलेल्या रक्षिता कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करुन
जिल्ह्यातील सर्व थर्ड पार्टीच्या कंञाटदार व त्यांचे कर्मचारी व विमा कंपनीच्या प्रतिनीधीची चौकशी करण्यात यावी.

जिल्हाभरातील सर्व तालुका प्रतिनीधी व थर्ड पार्टी कंञाटदारांची व त्यांच्या कर्मचार्‍यांची नैसर्गिक आपत्ती मध्ये पंचनामे झालेल्या काळातले फोनचे सिडीआर मागवावेत व मॅसेज Whatsapp चँट ची माहिती तपासावी यामुळे खुप मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

मुखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करुन सरसकट पंचनामे करा या मागण्यासाठी ऊद्या निवेदन द्यावयाचे असुन मुखेड तहसील कार्यालयात जास्तीत जणांनी यावे

Previous articleसंग्रहालयातील एक दुर्मीळ वाहन कमांडर…! 🛑
Next articleमुखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. रयत क्रांती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.