Home सोलापूर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष मा.श्री.भाऊ महाडीक यांनी माढा तालुक्यातील टेंभूर्णी ग्रामपंचायत...

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष मा.श्री.भाऊ महाडीक यांनी माढा तालुक्यातील टेंभूर्णी ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_074259.jpg

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष मा.श्री.भाऊ महाडीक यांनी माढा तालुक्यातील टेंभूर्णी ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

सोलापूर. टेंभुर्णी
या कार्यक्रमासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.अभिजीत पाटील यांना विशेष निमंत्रण दिले होते. यावेळी साहजिकच ऊस तोड व ऊस दर या विषयावर चर्चा झाली.
सोलापूर जिल्ह्यात व माढा तालुक्यात ऊसाला प्रति टन २४००/- रुपये दर जाहीर केला होता, मात्र गळीत हंगाम सुरू होताच व दराची स्पर्धा सुरू होताच तो २५००/- रूपयांपर्यत पोहोचला. मा.श्री.अभिजीत पाटील यांनी सर्वप्रथम २७००/- रूपये दर जाहीर केल्याने सगळ्या कारखानदारांना नाईलाजाने तेवढा अथवा त्यापेक्षा अधिक दर जाहीर करावा लागला.
वास्तविक साखर धंद्यात मुरलेल्या व जुन्या जाणत्या कारखानदारांनी पहिल्यांदाच २७००/- एवढा तरी दर जाहीर करायला हवा होता. मात्र मा.श्री.अभिजीत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर दर वाढवल्याने कारखानदारी पहिल्यांदा कमी जाहीर करून नंतर दिलेला वाढीव दर हा ऊस उत्पादकांना स्पर्धेमुळे मिळत असल्याने मी मा.श्री.अभिजीत पाटील यांचे अभिनंदन केल्यावर त्यांना मनस्वी आनंद वाटला.
या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचे नेते मा.श्री.संजय भाऊ पाटील घाटणेकर, मा.श्री.संजय बाबा कोकाटे, मा.श्री.दिपकराव खोचरे-पाटील, मा.श्री.योगेश बोबडे, मा.श्री.ऋषिकेश नाना बोबडे, मा.श्री.सुहास पाटील, मा.श्री.नितीन बापु कापसे, मा.श्री.दत्ताभाऊ ढवळे-पाटील, मा.श्री.भाऊ महाडीक व मा.श्री.दयानंद नाना महाडीक यांच्यासह टेंभुर्णी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी व अटकेपार झेंडा ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Previous articleलेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार 11 डिसेंबर ला मिटेवानी येथे ( मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत )
Next articleकरमाळा मतदार संघातील रस्ते व बांधकामासाठी तब्बल ६८ कोटींची तरतूद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here