Home राजकीय रिक्षा चालक ते मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री असा आहे CM.शिंदे जीवन प्रवास

रिक्षा चालक ते मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री असा आहे CM.शिंदे जीवन प्रवास

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0026.jpg

रिक्षा चालक ते मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री

असा आहे CM.शिंदे जीवन प्रवास
युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल रवि शिरस्कार

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा उगम निर्माण झाला शिवसेनेचे बंडखोर नेते संबोधित एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली
या घोषणामुळे अनेकांना धक्का बसला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि 30जून रोजी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

एकनाथ शिंदे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी झाला असून. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती. शिंदे यांनी लहान वयातच गाव सोडलं आणि ते ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांना कॉलेज सोडावं लागलं. घरची बेताची परिस्थिती, आर्थिक अडचणी यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला लागले.कालांतराने त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. पण हे काम करत असतानाच वयाच्या 18व्या वर्षी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला.

आनंद दिघेंचे निकटवर्तीय
मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंचा प्रचंड विश्वास होता. ते आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. पक्षाप्रतिची निष्ठा पाहून एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाची पावतीही मिळाली. 1984 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद देण्यात आलं.
1997 मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणूक लढवली. त्यात ते घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते 2001 मध्ये ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2002 मध्ये त्यांनी पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्यातही ते विजयी झाले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2005 मध्ये ते ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले. शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Previous articleराजीनाम्यामुळे सुसुंस्कृत, मितभाषी, प्रेमळ मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावले…?
Next articleजिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी रानवळकर सेवानिवृत्त ===================
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here