Home नांदेड जिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी रानवळकर सेवानिवृत्त ===================

जिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी रानवळकर सेवानिवृत्त ===================

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0028.jpg

जिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी रानवळकर सेवानिवृत्त
===================
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नरसी येथील जिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी.रानवळकर यांचा सेवा गौरव समारंभ आज दि. ३० जुन रोजी मोठ्या थाटात पार पडला. या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच एन.डी. नरसीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिविप्रा संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ कमलताई गायकवाड, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, प्रकाश पाटील भिलवंडे, सरपंच गजानन पाटील भिलवंडे, पञकार गंगाधर पाटील भिलवंडे, यांची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक आनंदराव गंगाराम रानवळकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देत सत्कार करून निरोप देण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव गायकवाड, श्रावण पाटील भिलवंडे, एन डी नरसीकर, पञकार गंगाधर पाटील भिलवंडे, अशोक पवळे, लालबा सूर्यवंशी, गायकवाड सर केसराळीकर, यांनी ए.जी.रानवळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डी.के.हनवटे, संस्थेचे उपाध्यक्ष विकास गायकवाड, माजी सरपंच शेख नवाब, पिराजी मेटकर, धोंडिबा सुर्यवंशी,
सह विद्यार्थी, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक रानवळकर यांनी अध्यापनाच्या कामासोबतच शाळेला मोठे योगदान दिलेले आहे.

प्रास्ताविक जिलानी सर बागवान यांनी केले तर आभार नंदकिशोर नरसीकर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक नंदकिशोर नरसीकर, रमेश ताटे, कवटीकवार, माने, यशवंत गायकवाड,चिंतले, घोसे मॅडम, जिंदमवार मॅडम, फेदेवार मॅडम सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शेख शादुल यांनी पुढाकार घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here