Home बुलढाणा मुख्याध्यापक डोंगरदिवे यांनी लावले शाळेत चोरीचे दिवे. तांदूळ विकतांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहात...

मुख्याध्यापक डोंगरदिवे यांनी लावले शाळेत चोरीचे दिवे. तांदूळ विकतांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहात ,गुन्हा दाखल करण्याची पोलीस स्टेशनला मागणी

167

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0029.jpg

मुख्याध्यापक डोंगरदिवे यांनी लावले शाळेत चोरीचे दिवे.

तांदूळ विकतांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहात ,गुन्हा दाखल करण्याची पोलीस स्टेशनला मागणी

युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार

मेहकर तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर डोंगरदिवे हे शाळेतील मुलांच्या पोषण आहारामधील तांदुळ विकतांना गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. याप्रसंगी शाळेच्या आवारात संपूर्ण गावकरी जमा झाल्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता.परंतु गावातील काही जाणत्या मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेऊन मुख्याध्यापक डोंगरदिवे यांना मेहकर पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .ज्या शाळेमध्ये मुलांना संस्काराचे धडे शिकवनाऱ्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकच जर हे त्या लहान मुलांना शासनाच्या वतीने देण्यात येणारा पोषण आहारावर डल्ला मारुन तस्करी करतील विश्वास ठेवायचा तरी कुणावर ? असा प्रश्न उपस्थित गावकरी मंडळींनी केला.
यावेळी देऊळगाव माळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कैलास राऊत यांनी शिक्षण अधिकारी किशोर पागोरे, जिल्हा परिषद बुलढाणा यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करून गटशिक्षण अधिकारी मेहकर यांच्यासोबत चर्चा करून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा या तांदूळ चोर मुख्याध्यापकावर शिक्षणाधिकारी ,तसेच पोलीस स्टेशन काय कार्यवाही करतील याकडे संपूर्ण लोकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleजिवन विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ए.जी रानवळकर सेवानिवृत्त ===================
Next articleमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नायगाव येथे फटाके व पेढे वाटून जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.