Home मुंबई राजीनाम्यामुळे सुसुंस्कृत, मितभाषी, प्रेमळ मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावले…?

राजीनाम्यामुळे सुसुंस्कृत, मितभाषी, प्रेमळ मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावले…?

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0020.jpg

राजीनाम्यामुळे सुसुंस्कृत, मितभाषी, प्रेमळ मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावले…?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पोर्टल)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पहिलं पाऊल ठेवले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी संपूर्ण मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या पहाण्यासाठी एकवटले होते. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंत्रालय सोडले तेव्हा तेच मंत्रालय गहिवरले होते.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष एकत्र आले. उद्धव ठाकरे हे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षाच्या काळात अनेक अडचणी संकट म्हणून ठाकरे सरकारसमोर उभे ठाकले. मात्र, त्यावरही मत करत देशाच्या पाच प्रभावी आणि लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पाचमध्ये त्यांनी स्थान मिळवले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. उद्या विधिमंडळात सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्याचा निकाल काय लागणार याची पूर्ण कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळेच सलग दोन दिवस त्यांनी राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेतल्या. काल त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्रिमंडळाची बैठक घेतली तर आज मंत्रालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी ही बैठक घेतली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मी राज्यासाठी चांगले काम केले. पण, माझ्याच पक्षाच्या काही लोकांनी मला दगा दिला. माझी साथ सोडली म्हणूनही परिस्थिती निर्माण झाली. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे त्याला सामोरे जाऊ. मागील अडीच वर्षात तुम्ही सर्वानी चांगले सहकार्य केले. आपले ऋणानुबंध कायम ठेवून पुढे जाऊ. माझ्याकडून कोणी दुखावले गेले , कोणाचा अपमान झाला असेल तर माफ करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आणि सर्वांचा निरोप घेऊन सातव्या मजल्यावरील सभागृहातून बाहेर पडले. यावेळी मंत्रालयीन कर्मचारी आणि भेटायला येणाऱ्यांची मोठी गर्दी होती. सातव्या मजल्याच्या लिफ्टने मुख्यमंत्री मंत्रालयाच्या तळमजल्यावर आले. तोपर्यत सहाव्या मजल्यापासून तळ मजल्यापर्यतचा सगळा परिसर कर्मचाऱ्यांनी व्यापला होता. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. गर्दीतून एकच गलक झाला,. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत या, आम्हाला तुम्ही हवे आहात’. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा हात जोडून सर्वाना अभिवादन केले.

माजी मुख्यमंत्री ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना निरोप देताना अधिकारी, कर्मचारी ‘मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत या, आम्हाला तुम्ही हवे आहात.’ असे सांगत होते. ज्या मंत्रालयाने अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे उत्साहात स्वागत केले तेच मंत्रालय आज त्यांना निरोप देताना गहिवरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here