Home गडचिरोली आजपासून गडचिरोली तालुक्यात रेती वाटपास सुरुवात!! घरकुल बांधकामासाठी स्वामित्व धन न आकारता...

आजपासून गडचिरोली तालुक्यात रेती वाटपास सुरुवात!! घरकुल बांधकामासाठी स्वामित्व धन न आकारता रेती वाटप करिता आंबेशिवणी रेती घाटावर आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते अमिर्झा येथील लाभार्थी यांना रेती वाटप!!

42
0

राजेंद्र पाटील राऊत

!आजपासून गडचिरोली तालुक्यात रेती वाटपास सुरुवात!!
घरकुल बांधकामासाठी स्वामित्व धन न आकारता रेती वाटप करिता आंबेशिवणी रेती घाटावर आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते अमिर्झा येथील लाभार्थी यांना रेती वाटप!!                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
!गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल धारक व शौचालय बांधकाम करणारे यांच्या कडून आमदार डॉ होळी यांचे अभिनंदन!
दिनांक 23 एप्रील 2022
गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल
लाभार्थी व संडास बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब
घरकुल योजना व शौचालय बांधकाम करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत होता या विषयावर गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार , संवर्ग विकास अधिकारी, यांच्यासोबत बैठक घेऊन नुकताच तोडगा काढला
व गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती व शौचालय लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती देण्याचा राज्य शासनाचा निर्णय असून सदर रेती सबंधित गाव जवळील आंबेशीवनी रेती घाटावरून आमिर्झा व परिसरातील सबंधित लाभार्थी यांना द्यायचे होते परंतु तालुका स्तरावरील प्रशासनास याची माहिती नव्हती
हा विषय आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे लावून धरला व आजपासून गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवनी घाटावरून घरकुल योजना व शौचालय लाभार्थी यांना तहसील कार्यालय
कडून स्वामित्व धन न आकारता गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते त्या भागातील पंचायत समितीच्या यादी नुसार उपस्थित लाभार्थी यांना रेतीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार साहेब संवर्ग विकास अधिकारी मुकेश माहोर , तलाठी आंबेशीवणी, भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे
अमीर्झा येथील सरपंच सौ सोनाली नागापुरे , ग्रामसेविका सौ, देशमुख ताई , प्रवीण टेंभूर्णे, विलास नागापुरे , नीलकंठ रंदये , सुधाकर धाकडे , दीपक नन्नावरे ,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,यावेळी बोलतांना आमदार डॉ होळी यांनी सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील
समस्त ग्रामपंचायत यांनी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल व शौचालय बांधकाम लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून देण्याचे आव्हान केले

Previous articleअनसिंग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लेझीम च्या तालात मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleमोहफुलांपासुन दारु निर्मितीस राज्य सरकारची मान्यता।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here