Home गडचिरोली मोहफुलांपासुन दारु निर्मितीस राज्य सरकारची मान्यता।

मोहफुलांपासुन दारु निर्मितीस राज्य सरकारची मान्यता।

103
0

राजेंद्र पाटील राऊत

मोहफुलांपासुन दारु निर्मितीस राज्य सरकारची मान्यता।
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) अनेक प्रकार चे पोषक असलेल्या मोहफुलांपासुन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले जातात .पण मोहफुलांचा जास्तीत जास्त वापर हातभट्टिची गावठी दारु बनविण्यासाठी केला जातो.विशेष मनजे या गावठी दारुचे आकर्षण विदेशी दारु पिणार्यांनाही असते.असे असतांना आतापर्यत मोहफुलांपासुन देशी दारु सुध्दा बनविण्याची परवाणगी नव्हती.आता माञ राज्य मंञिमंडळाणे मोहफुलांपासुन थेट ” विदेशी”दारु बनविण्याची परवाणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे मोहफुल गोळा करुन थोडिथोडकी कमाई करणार्या जंगलशेजारील आदिवासी कुंटुबाचे अर्थचक्र बदलणार का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात विदर्भातील गडचिरोली,चद्रपुर गोंदिया,व भंडारा या चार जिल्हांसह धुळे आणी ठाणे या जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुले उपलब्ध होतात.उन्हाळ्यातील जेमतेम एक ते दिड महीन्याच्या कालावधीत तब्बल एक ते सव्वा लाख मेट्रिक टन मोहफुले (किंमत 400 कोटी रुपये)गोळा केली जातात.जंगलातुन आणलेली मोहफुले वाळवुन साठवुन ठेवली जातात.नंतर ती व्यापार्यानां 40 ते 50 रुपये किलो दराने विकली जातात.साधारण एक कुंटुब यातुन एका हंगाम्यात 10 ते 12 हजार रुपये कमवते.आता या मोहफुलापासुन विदेशी दारुची निर्मिती सुरु झाल्यास मोहफुलाचे सध्याचे दर दुप्पट,तिप्पट वाढुन आदिवासी कुंटुबाची मिळकतही वाढणार आहे.
महत्त्वाचा वनपोज असलेल्या मोहफुलांवरील काही बंधने राज्य शासनाने गेल्या वर्षी 4 मे 2021 रोजी शीथिल केले आहेत.राज्याचे तत्कालीन वन सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 2017 मध्ये केलेल्या शिफारशीच्या आधारे मोहफुंलांना बंधनमुक्त करण्यात आले. त्यानुसार मोहफुलाची खरेदी,गोळा करणे आणी वाहतुन यावरील निबध मागे घेण्यात आले.त्यामुळे जंगलातुन मोहफुले गोळा करुन आणुन ती वाळवुन अधिकृत पणे विक्रि करण्याचा मार्ग गेल्या वर्षीशीच मोकळा झाला.
मोहफुलांवरील बंधने शीथिल करतांना शासनाने मोहफुलाची साठवणुक,विक्रि व व्यापार करण्यासाठी एमएम-2 परवान्यात वाषिक कोटिची मर्यादा 500 क्विंटलपर्यत मर्यादित केली आहे.शिवाय हा परवाना केवळ आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था,महिला बचत गट सहकारी संस्था किव्हा ग्रामपंचायत अशा मान्यताप्राप्त संस्थानाच मंजुर केला जाणार आहे.गडचिरोली हा दारु बंद असलेला जिल्हा असल्यामुळे मोहफुलाच्या मद्यनिमितीचा कारखाना या जिल्हात होणार नसला तरी येथील मोहफुंलांना चागला भाव मिळनार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here