Home नांदेड याशोदीप कोचिंग क्लासेस मध्ये वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन व निरोप समारंभ संपन्न.

याशोदीप कोचिंग क्लासेस मध्ये वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन व निरोप समारंभ संपन्न.

159
0

राजेंद्र पाटील राऊत

याशोदीप कोचिंग क्लासेस मध्ये वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन व निरोप समारंभ संपन्न.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

यशोदीप कोचिंग क्लासेस मध्ये 13 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन व निरोप समारंभ संपन्न झाला. व त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष एडवोकेट ऋषिकेश जोगदंड उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे: प्रशांत अण्णा तिडके नगरसेवक मनपा नांदेड ,लीलाधर महारानियॉ , CO सीआरपीएफ मुदखेड डॉक्टर रमेश रेंगे बालरोग तज्ञ रेंगे हॉस्पिटल नांदेड, आकाश माधसवाड उपाध्यक्ष प्रियदर्शनी मेमोरियल ट्रस्ट ,
नरेश भोसले संचालक IIB नांदेड,पंजाब पाटील जोगदंड
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून
किरण आंबेकर तहसीलदार नांदेड, डॉक्टर संजय कदम संचालक आधार हॉस्पिटल नांदेड ,डॉक्टर भारती संचालक वेदस्पर्श हॉस्पिटल नांदेड,
शिव कुमार टाले संचालक राणी लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय नांदेड , ज्योती कर्सर राम वानखेडे सर, शुभम माळवे ,तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणारे विद्यार्थी ,शिक्षक ,सहकारी , मित्र व पालक यांच्यासमवेत मोठ्या उत्सुकतेने कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते या तथा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या डॉक्टर भारतीताई मडवी यांनी विद्यार्थ्यांना तब्बल चाळीस मिनिटे विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. व त्यासोबतच आधार हॉस्पिटल संचालक डॉक्टर संजय कदम यांनी देखील विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे आणि कसे यश मिळवले पाहिजे या विषयावर भर देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आणि या कार्यक्रमाला विशेष म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील पुरेपूर माहिती देण्यामध्ये यशोदीप कोचिंग क्लासेस हेतू साध्य झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोदीप कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा.जोगदंड सर ,प्रा.कासराळे सर ,प्रा.लुंगारे सर ,प्रा.मेहत्रे सर, प्राध्यापक ठाकूर सर प्रा. गणेश शिंदे सर प्रा. विष्णुकांत सर,श्री.संदीप जोगदंड सर,श्री. मुरकुटे सर, व यशोदीप कोचिंग क्लासेस संपूर्ण शिक्षक वृंद यांनी व कर्मचारयांनी सहकार्य केले.

Previous articleदु:खद घटना, चारठाणा जवळ तिन मोटारसारकल स्वरांचा जागेवर मृत्यू
Next articleराजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी मध्ये रक्तदान शिबीर ; ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here