Home नांदेड राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी मध्ये रक्तदान शिबीर ; ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी मध्ये रक्तदान शिबीर ; ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

103
0

राजेंद्र पाटील राऊत

राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी मध्ये रक्तदान शिबीर ; ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड/ मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

राजे छत्रपती अकॅडमी, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र बेरळी फाटा मुखेड , अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त दि.१२ मार्च 2022 शनिवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तादान शिबिरात सैनिक का सहित अकॅडमीतील विद्यार्थी व मुखेड मधील अनेकांनी ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड भुषण डॉ.दिलीपराव पुंडे होते तर उद्घाटक म्हणून जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार महेश हांडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड, विरपत्नी कोमल काळे, काँग्रेसचे दिलीप कोडगिरे, उत्तमआण्णा चौधरी, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुटे, सरपंच प्र.शंकर पाटील जांभळीकर,सुरेश पाटील बेळीकर, सरपंच प्र.बालाजी पाटील सांगवीकर,सरपंच भुजंग देव्हारे, सरपंच प्र.संदीप घाटे, ग्रा.पं.सदस्य सुनिल आरगिळे,भारत गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिलीपराव पाटील बेटमोगरेकर बोलताना म्हणाले की ज्ञानेश्वर डुमणे यांनी गेल्या चार वर्षापासून मुखेड तालुक्यांमध्ये सामाजिक बांधिलकीतून अनेक दर्शनीय उपक्रम राबवित आहेत… आम्हा मुखेड वासि यांसाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे कमी वेळामध्ये आपल्या मेहनतीच्या बळावर अकॅडमीचे व मुखेड तालुक्याचे नाव महाराष्ट्रभरात पोहचवले.देशासाठी सैनिकांचे खूप मोठे योगदान आहे या ठिकाणी जिल्ह्यातील ५० ते ६० आजी माजी सैनिकांची उपस्थिती पाहून खरंच आम्हालाही अभिमान वाटला.
कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार संघाचे सचिव महेताब शेख यांनी केले, प्रस्तावना राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी चे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बालाजी चुकलवाड यांनी मानले.
रक्तादान शिबिराचे रक्त संकलण करण्यासाठी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ब्लॅड बँक विष्णुपुरी नांदेड येथील टिमने सहकार्य केले यावेळी राजमुद्रा ग्रुपचे सचिन पाटील इ़ंगोले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शंकर वडेवार, शहरप्रमुख साईनाथ बोईनवाड, बालाजी बाबळे, गोविंद घोगरे, शिवव्याख्याते बजरंग पाटील, प्रहारचे ता. उपाध्यक्ष बालाजी आईनवाड, बलभिम शेंडगे, बाबुराव गिरबनवाड, बळवंत पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच,उपसरपंच, आजी-माजी सैनिक,पॅरामिल्ट्री, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट…
विरपत्नीचा सन्मान…
सिमेवर देशसेवा बजावत असताना शहीद झालेले जवान काळे यांच्या विरपत्नी कोमल काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला…

चौकट…
आजी माजी सैनिकांचा सत्कार…
देश सेवेचा कार्यकाळ पुर्ण करुन सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व सध्या कार्यरत असलेले सेवारत सैनिकांचा अकॅडमीच्या वतीने सन्मानचिन्ह, शॉल ,पुष्पहार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..

चौकट…
विषेश सत्कार…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या केदार उमाटे व अनिकेत बंडे या गुणवंतांचा विषेश सत्कार करुन गौरव करण्यात आला.

Previous articleयाशोदीप कोचिंग क्लासेस मध्ये वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन व निरोप समारंभ संपन्न.
Next articleकरोना महामारीच्या तीन लाटा, पर्यटन उद्योगाला उतरती कळा..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here