Home उतर महाराष्ट्र जन्मदिवस विकासमहर्षींचा……! “महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते मा.काॅ.जे.पी.गावित साहेब” —प्रा.डॉ.गोविंद पाटील.

जन्मदिवस विकासमहर्षींचा……! “महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते मा.काॅ.जे.पी.गावित साहेब” —प्रा.डॉ.गोविंद पाटील.

288
0

राजेंद्र पाटील राऊत

जन्मदिवस विकासमहर्षींचा……!

“महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते
मा.काॅ.जे.पी.गावित साहेब”

—प्रा.डॉ.गोविंद पाटील.

“झेलतो कित्येक आहे रोज आता वार मी
झुंजलो या वास्तवाशी मानली ना हार मी
आपल्यांच्या भल्याचे संकल्प हे सारे मनी
घेऊन जगत आलो आता क्षितीजा पार मी”.
या काव्यपंक्ती प्रमाणे समग्र जीवन जगणारे आमुचे मार्गदर्शक व प्रेरणास्रोत, महाराष्ट्रातील खंबीर, लढवय्ये, झुंजार, लोकप्रिय नेते, तरूणांचे आधारस्तंभ, दुर्गम आदिवासी भागाचे शिक्षणमहर्षी, सुरगाणा-पेठ-कळवण परिसराचे विकासपुरुष, जनसामान्यांचे भाग्यविधाते, जननायक, लोकनेते व आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुन या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कळवण-सुरगाणा मतदार संघाचे ज्येष्ठ क्रांतीकारी नेते मा.आ.काॅ. जे.पी.गावित साहेब:-D  यांचा आज जन्मदिवस…..!🎂

आदरणीय काॅ.गावित साहेब म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण-आदिवासी जनतेचे कैवारीच आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी आपले भरीव योगदान देऊन शेतकरी, कास्तकरी कामगार वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीकोन ठेवून कार्य करणारे जाणकार, कृतीशील लोकनेते म्हणून समग्र महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे. आपल्या परिसरातील जनतेच्या कल्याणासाठी निश्चित उद्देश घेऊन रचनात्मक कार्याला दिशा देणारे ते खरे समाजोध्दारकच आहेत. दारिद्रय, उपासमारी, बेकारी, अज्ञान व अंधश्रद्धा इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम मा. काॅ. गावित साहेबांनी केले आहे.

एका सर्वसामान्य परिवारात अलंगुण ता. सुरगाणा जि.नाशिक येथे १७ डिसेंबर १९४९ रोजी लक्ष्मीबाई व पांडू गावित या दांम्पत्यापोटी जन्मलेल्या आदरणीय गावित साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाई बरोबरच समाजाच्या अस्तित्वाची अन् अस्मितेचेही लढाई लढली आहे. आपल्या या दुर्गम-अतिदुर्गम भागातील समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे मूळ कारण शोधून, शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १९८९ मध्ये “आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ” नावांच्या इवलुश्या रोपट्याचं रोपन केले, आज त्या इवल्याशा रोपट्याचे रूपांतर महाकाय वटवृक्षात झाले आहे. सद्यस्थितीत या शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये हजारो मुलं ज्ञानार्जन व शेकडो शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. सदर शिक्षण संस्थेची स्थापना करून कॉ.गावित साहेब या भागाचे खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ अर्थात उद्धारकचं ठरले. या शिक्षण संस्थेत शिकुन गलेले अनेक विद्यार्थी सद्यस्थितीत डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील विविध पदांवर कार्य करत सन्मानाने जीवन जगत आहेत. परिसरातील अनेक विद्यार्थी MPSC, UPSC, SET, NET इत्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर बरेच विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून निवड होऊन विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच काहीजण छोटा-मोठा व्यवसाय अगदी आनंदाने उत्तमरित्या करत, स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. परिसरातील भूमीहीन, अल्पभूधारक, शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना सक्षम बनविण्यासाठी प्रथम शिक्षण व त्याबरोबरच सुक्ष्म, लघू, मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्याचे प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त करुन उद्योगशील, होतकरू तरुणवर्ग निर्माण करत स्वावलंबी जीवन जगण्याचा आदर्श वस्तुपाठच साहेबांनी घालून दिला आहे. ज्यामुळे परिसरातील अनेक तरुण-तरूणी सक्षमपणे विविध उद्योग-व्यवसाय जगतात आपले पाय घट्ट रोवत आहेत. हे केवळ साहेबांच्या शिक्षण-व्यवसायाविषयी असणाऱ्या दूरदृष्टीनेच साध्य झाले आहे. कारण त्यांनी तत्कालीन कालखंडात हेरले होते की, मागासलेपणाचे मूळ कारण हे येथिल अज्ञान आणि अंधश्रद्धेत दडलेले आहे आणि त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच उदात्त हेतूने व व्यापक विचारांने शिक्षण संस्थेची स्थापना करून दुर्लक्षीत, वंचित आदिवासी मुलांच्या उत्कर्षासाठी सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, कळवण तालुका परिसराच्या कानाकोपऱ्यात शाळा, महाविद्यालये स्थापन केले आणि शिक्षणाची दारे खुली करण्याचे पवित्र कार्य हाती घेतले व तडीस नेले. म्हणूनच आज अनेक विद्यार्थी यशाचे उंच शिखर अगदी सहज पादाक्रांत करत आहेत. यामुळेच या परिसरातील तरुणांचे आदरणीय काॅ. गावित साहेब हे आदर्श तर आहेतच त्याचबरोबर आधारस्तंभही आहेत.

ग्रामीण-आदिवासी जनतेची मुलुख मैदानी, बुलंद तोफ म्हणजे आदरणीय काॅ. गावित साहेब होत. येथिल समाजाला रचनात्मक कार्याची दिशा देऊन अन्याय, अत्याचाराला विरोध करण्यासाठी क्रांतीकारी विचारांची ऋजवण करत समाजपरिवर्तन घडवून आणण्याचं कार्य त्यांनी केले आहे. म्हणून त्यांना क्रांतीकारी लोकनेते असे संबोधले जाते. १९७० च्या दशकात काॅ.गोदाताई परूळेकर, काॅ. नाना मालुसरे व कॉ. रामजी धुळे यांच्या विचारांने प्रभावित होऊन, शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून अतिदुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे आलेले गावित साहेब CPM पक्षाच्या माध्यमातून १९७८ मध्ये प्रथमतः विधानसभेत आमदार म्हणून दाखल झाले आणि सतत आठ पंचवार्षिक योजना या परिसराचे नेतृत्व करत येथिल समाजाचे वनजमिन, राशन, वृध्दापकाळ, रोजगार, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, इत्यादी मुलभूत सेवा-सुविधेसंदर्भातील अनेक प्रश्न सोडवले व आजही सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. समाजासाठी समग्र आयुष्य अर्पण करणारे काॅ. गावित साहेब हे या परिसराचे ध्येयवादी, कृतीशील नेते वा विकासपुरुष आणि खरे दैवतच आहेत.

सुरगाणा-पेठ-कळवण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खात्यामार्फत मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करणारे हुशार, अभ्यासू व अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून गावित साहेबांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यानी आदिवासी विकास विभागा अंतर्गत विविध योजना व कृषी, जलसंपदा, जलसंधारण, महसूल व वन, नगरविकास, बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, हस्तकौशल्य विकास, उद्योग, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, मागासवर्गीय कल्याण, रोजगार हमी योजनेसह विविध ग्रामीण विकासाची कामे करून परिसराचा सर्वोतोपरी विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. म्हणूनच ते परिसराचे व जनसामान्यांचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात. अशा अनेक विकास कामातून जनसामान्यांचे मने जिंकून त्यांच्या काळजात घर करणारा लोकनेता म्हणून लौकिक आहे.

विधीमंडळ व मंत्रालयीन प्रशासकीय कामकाजाचा तब्बल ४० वर्षे व त्यापेक्षा जास्त काळ अनुभव असणारे, हंगामी विधानसभा अध्यक्षपद भुषविणारे, लोकहिताय दृष्टिकोन घेऊन गोर-गरीब जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने काम करणारे, ‘सामुदायिक विवाह’ या कल्पनेचे संकल्पनाकार वनजमीनी संदर्भात सरकारला “वनहक्काचा कायदा” करायला लावून “वनजमीनीचा सातबारा” प्रत्यक्ष गोर-गरीब जनतेच्या नावावर करून देण्यास शासनाला भाग पाडणारे इत्यादी विविध धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याच्या राजकारणात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्यकर्तृत्वाचा ठसा समग्र राजकारणावर निर्माण करणारे महाराष्ट्रातील एकमेव अद्वितीय, धुरंधर नेतृत्व म्हणजे आदरणीय गावित साहेब होत.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून गरीबी, दारिद्रय, उपासमारीने ग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांना शेतीपुरक व्यवसाय आणि अत्याधुनिक रोजगाराच्या संधी निर्माण करून देणारे, समाजातील प्रत्येक घटकाला समाजनिष्ठा, श्रमनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा याची शिकवण देऊन वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजक्रांतीच्या विचारांची ऋजवण करणारे, जेष्ठ राजकीय नेत्यांशी व शासकीय-प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करताना खंबीरपणे, अभ्यासपूर्ण रोखठोक आपली भूमिका मांडणारे, विविध मोर्चे, आंदोलने, हरताळाच्या माध्यमातून हक्क मागुन नाही मिळाले तर हिसकावून घेणारे, “लाॅंग मार्च” सारख्या मोर्चाने जागतिक पातळीवर आपली खास ओळख निर्माण करणारे मा.काॅ.गावित साहेब म्हणजे बहुश्रुत, बहुगुणी व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारं तुमचं आमचं चालतं-बोलतं ‘विद्यापीठ’ अथवा ‘संस्कारपीठ’च होय.

असे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कृतत्वाचा ठसा प्रभावीपणे उमटवणारे आदरणीय काॅ.गावित साहेब हे येथिल तरूणांचे, समाजाचे व आम्हा शिक्षकांचे आदर्श, मार्गदर्शक व प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभच आहेत. आज असे उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आदरणीय काॅ.जे.पी.गावित साहेब यांचा ७२ वा वाढदिवस आणि त्या औचित्यानेच केलेला हा लेखनप्रपंच…..

*आदरणीय साहेब,*
नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी अन् आनंद शतगुणित व्हावा तुमच्या जीवनी.
ह्याच आपणास वाढदिवसानिमित्त अगदी मनापासून खूप-खूप शुभेच्छा….!!!
आपलं समग्र आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी, निरोगी व भरभराटीचे जावो याचं मनस्वी सदीच्छा…..!!!
*”आप जिओ हजारो साल*
*साल के दिन हो पचास हजार”*

आदरणीय साहेब, आपण शतायुषी व्हावं, आपणास पुनश्च एकदा उदंड निरोगी, निरामय दीर्घायुष्याच्या अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा…..!!!💐💐🙏🙏🙏

–✍️प्रा.डाॅ.गोविंद पाटील, चिंचला
ता.सुरगाणा जि.नाशिक
मो.नं.९८६०९१३६३५
९५३७८१५९९४
🌺💐💐💐🎂🎂💐💐💐🌺

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here