Home भंडारा अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा व पहेला ते अंभोरा...

अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा व पहेला ते अंभोरा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम 13 जानेवारी

329
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_073841.jpg

अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा व पहेला ते अंभोरा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम 13 जानेवारी

केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील पहेला ते अंभोरा सिमेंट क्रॉटिक रस्त्याचे भूमिपूजनाच्या कार्यक्रम 13 जानेवारी 2024 ला सकाळी 10.30 वाजता रोज शनिवारी अंभोरा देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेला आहे .वरील कार्यक्रमाचे उद्घाटन नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री महामार्ग विभाग भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा हे राहणार आहेत .प्रमुख उपस्थिती म्हणून विजयकुमार गावित पालकमंत्री भंडारा जिल्हा, खासदार सुनील मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र ,चंद्रशेखरजी बावनकुळे विधान परिषद सदस्य, आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारा विधानसभा क्षेत्र ,प्रफुल पटेल खासदार राज्यसभा ,परिणय फुके विधानपरिषद सदस्य, सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य, मुक्ता कोकर्डे जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर ,कृपाल तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र ,अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य, गंगाधर जीभकाटे अध्यक्ष भंडारा जिल्हा परिषद यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत वरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय व अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांनी केलेले आहे.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ परभणी येथे २ फरवरीला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
Next articleअंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्वाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय; 13531 पदांची होणार भरती…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here