• Home
  • भव्य रक्तदान शिबिर दहिवडला संपन्न

भव्य रक्तदान शिबिर दहिवडला संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201217-WA0074.jpg

भव्य रक्तदान शिबिर दहिवडला संपन्न

(युवराज देवरे प्रतिनिधी)
कुलस्वामिनी धनदाई माता शैक्षणिक, सामाजिक ट्रस्ट दहिवड ता देवळा जि नाशिक यांचे वतीने आज गुरुवार दि. १७/१२/२०२० रोजी आपल्या भारत देशावर आलेल्या कोरोना या गंभीर आजाराचे पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने दहिवड ता देवळा जि नाशिक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आजच्या रक्तदान शिबिरात एकुण ५८ बॅग रक्त स्व.डाॅ.जी.एम.भावसार चॅरिटेबल ट्रस्ट मालेगाव ब्लड बॅंकेकडे सुपुर्द करण्यात आले.
….. यावेळी कुलस्वामिनी धनदाई माता सामाजिक, शैक्षणिक ट्र्स्टचे अध्यक्ष प्रदिप देवरे.
सचिव विजय देवरे, खजिनदार द्वारकाधिश देवरे, संचालक प्रेमनाथ देवरे ,यांसह अन्य संचालक तसेच जि प प्राथमिक शाळा दहिवड शिक्षक जिजामाता माध्यमिक विद्यालय शिक्षक ना.जि.म.सह.बॅंक कर्मचारी म.रा.वि.वि.कं.कर्मचारी दहिवड प्रा.आ.केंद्र कर्मचारी पत्रकार मनोज वैद्य, पत्रकार युवराज देवरे तसेच नवयुवक तरूणांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवला.

सदर प्रसंगी कुलस्वामिनी धनदाई माता ट्रस्ट अध्यक्ष प्रदिप देवरे ,
उपाध्यक्ष माणिक देवरे ,सचिव विजय देवरे, खजिनदार द्वारकाधिश देवरे, संचालक प्रेमनाथ देवरे, मोठाभाऊ देवरे ,जिभाऊ आनदा देवरे ,डी पी देवरे, संचालक संजय दहिवडकर, योगेश देवरे, दिनेश देवरे, यांसह अन्य संचालकांनी तसेच सरपंच आदिनाथ ठाकूर ,उपसरपंच मनेश ब्राम्हणकार, डॉ राजेंद्र ब्राम्हणकार ,सुभाष सोनवणे बळिराम सोनवणे ,पत्रकार मोठाभाऊ मोरे. आदिंनी रक्तदान शिबिरासाठी परीश्रम घेतले.शिबिरासाठी विषेश सहकार्य गंगाधर खैरणार यांनी केले.

anews Banner

Leave A Comment