Home नांदेड राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादनानंतर —————————————— आज आरक्षण कृती समितीचा आक्रोश...

राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादनानंतर —————————————— आज आरक्षण कृती समितीचा आक्रोश मोर्चा

150
0

राजेंद्र पाटील राऊत

राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादनानंतर
——————————————
आज आरक्षण कृती समितीचा आक्रोश मोर्चा

मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने नांदेड येथे राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती तर्फे दिनांक २६ जून रोजी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पावडेवाडी नाका येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला सकाळी ११.३० वाजता अभिवादन करून कृती समितीच्या विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समितीचे समन्वयक अभियंता भरतकुमार कानिंदे, टी.पी. वाघमारे, अभियंता सिद्धार्थ पाटील, अभियंता भीमराव धनजकर आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

संविधानाने दिलेल्या देशभरातल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गंडांतर आणण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी राज्यात विविध मागासवर्गीय अधिकारी- कर्मचारी संघटनांची राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी नांदेडमध्ये कृतिशील आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.

कृती समितीच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नांदेड येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला कृती समिती अभिवादन करून आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या पुतळ्याला ही कृती समिती अभिवादन करण्यासाठी जाणार आहे.

या देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर कृती समितीच्या आक्रोश मोर्चा मोर्चाचे शिष्टमंडळ नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध न्यायपूर्ण मागण्यांचे निवेदन देणार आहे. राज्यस्तरीय आरक्षण कृती समिती मध्ये मागासवर्गीयांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या विविध अधिकारी- कर्मचारी संघटनांचा समावेश आहे.

आक्रोश मोर्चा आणि महापुरूषांच्या अभिवादन कार्यक्रमात कृती समितीच्या संघटनांचे मिलिंद भिंगारे, आर. एस. टोके, जीवन कांबळे, नितीन राऊत, रोहिदास कांबळे, डी.पी. झगडे, अभिजीत बळेगावकर, कु. तेजस्विनी हत्तीहंबीरे, डी.एम. हनुमंते अशोक राठोड, अविनाश चव्हाण, बी.एम. भाडेकर, प्रकाश राठोड, वसंत शिरसे, अमोल सोनकांबळे, एस. एम. सावते,ए. आर. गणलेवार, वसंत वीर, ए. यू. सूर्यवंशी, एस. डी. दामोदर, निखिल कानिंदे, साजन धनकर,रणजित जामखेडकर आदी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत नांदेड जिल्हा व शहरातील राजकीय पुढारी आणि सामाजिक चळवळीतील मान्यवर कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे ही कृती समितीच्या पत्रकात म्हटले आहे.

Previous articleराजुरा प्राथमीक आरोग्य केंद्राचा भोगंळ कारभार .
Next articleवाशिम जिल्ह्याचा सपुत्र श्री सानप मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती मेडशी गावचे जावाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here