Home नाशिक नेहरुनगर (झाडी) येथे स्वातंत्र्यदिन,उत्साहात साजरा

नेहरुनगर (झाडी) येथे स्वातंत्र्यदिन,उत्साहात साजरा

313

आशाताई बच्छाव

Screenshot_20230817-182929_WhatsApp.jpg

सौंदाणे,(प्रतिनिधी काकासाहेब सांळुखे)

दि १५ ऑगस्ट २०२३ रोजी जि.प शाळा नेहरु नगर ( झाडी ) येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रथम कार्यक्रमाची प्रस्तावणा , ध्वजपूजन व ध्वजारोहण सुचणा श्री. किशोर पवार मुख्याध्यापक यांनी केले. तर अनुमोदन श्री. बापू नेमनार सर यांनी केली. ध्वजपुजन सौं अर्चणा वडक्ते उपाध्यक्ष SMC यांनी केले. तर ध्वजारोहण श्री. काकाजी साळुंके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नेहरू नगर यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विध्यार्थीनी मराठी, इंग्रजीतुंन सुंदर भाषने सादर करुन उपस्थिताचे लक्ष वेधून घेतले. त्याचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
तसेच या प्रसंगी नाशिक जिल्हयातील अग्रेसर शिक्षकांची अर्थवाहीणी मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या . चेअरमण पदी मुख्याध्यापक श्री. किशोर पवार सर यांची बिनविरोध निवडी निमित्त शाळा व्यवस्थापन समिती , पालक वर्ग, ग्रामस्थ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांस सर्व मान्यवरांची व पालक वर्गासह सर्वांचीच बहुसंख्य उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमास भुमिपुत्राची लक्षणीय उपस्थिती दर्शविली त्या बदल त्यांचे शतशः आभार व धन्यवाद.
तसेच माननीय श्री. किशोर पवार सर व श्रीं बापू नेमनार सर यांनी भारतीय क्रांतिचा इतिहास, परंपरा विषयी मनोगत व्यक्त केले .
उपस्थीत सर्वांचे शालेय कार्याला सहकार्या बद्दल व उपस्थीती बद्दल आभार मानुन कार्यक्रमाची सागंता केली.

Previous articleलोह्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Next articleझाडी गावातील खड्डयाबाबत मनसेचे वृक्षारोपण आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.