Home जालना हळदी- कुंकू समारंभात वैशालीताई घाटगे यांनी जपला सर्वधर्मसमभाव

हळदी- कुंकू समारंभात वैशालीताई घाटगे यांनी जपला सर्वधर्मसमभाव

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_214430.jpg

हळदी- कुंकू समारंभात वैशालीताई घाटगे यांनी जपला सर्वधर्मसमभाव

पाडुळीतील कार्यक्रमात मुस्लीम भगींनीही नोंदवला सहभाग

घनसावंगी/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: तालुक्यातील पाडळी बुद्रुक, कंडारी अंबड, अंतरवाली टेंभी, पिंपरखेड बुद्रुक, कोठी या गावातील महिलांसोबत मकर संक्रांतिनिमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभास मोठा प्रतिसाद मिळाला. मुस्लिम भगिनीचाही या समारंभात सहभाग होता हे विशेष. वैशालीताई घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने सर्वधर्मसमभावाचे अनोखे उदाहरण दाखवले.  या कार्यक्रमास वैष्णवी उढाण, निलकमल फलके, पुजा हर्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

समृद्धी ट्रस्टच्या माध्यमातून वैशालीताई सातीश घाटगे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.विविध घटकातील कुटुंबाना त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा फायदा होत आहे. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने वैशालीताई घाटगे   सर्वांशी आपुलीकीने संवाद साधत असल्याने त्यांच्या कार्यक्रमांना सर्व स्तरातील महिला सहभागी होत आहे. मकरसंक्रातीनिमित्त पाडुळी बुद्रुक गावात  आयोजित कार्यक्रमात कंडारी अंबड, अंतरवाली टेंभी, पिंपरखेड बुद्रुक, कोठी या गावातील महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. वि शेष म्हणजे या कार्यक्रमास मुस्लीम महिलांनीही सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला. वैशालीताई सातीश घाटगे यांनी सर्वांशी संवाद साधला. सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्‍छा दिल्या. उपस्थित सर्व महिलांनी  वैशालीताई घाटगे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यातसेच एकमेकींना सौभाग्याचं वाण देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमासाठी जावेद शेख, निखिल फलके, सुदर्शन राऊत,बाबा उढाण यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here