Home जालना मुलांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अपहरण केलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका,०२...

मुलांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अपहरण केलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका,०२ पुरुष०१महिला जेरबंद.

153

आशाताई बच्छाव

1000341960.jpg

मुलांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अपहरण केलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका,०२ पुरुष०१महिला जेरबंद.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 25/ 04 /2024 रोजी 2.30 वाजता बस स्थानक परिसरातून कु.नेहा सुनील शिंदे वय 05 वर्ष राहणार बानेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना अशा वर्णनाची मुलगी अज्ञात इसमांनी पळवून नेल्या बाबत फिर्यादी नामे सुशिलाबाई आत्माराम शिंदे राहणार बानेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे कडे वर्ग केला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मागील आठ दिवसापासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामी अहोरात्र प्रयत्न केले व जालना, परभणी, नांदेड, बीड, पुणे येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण माहितगार यांचेकडून माहिती संकलित करून गुन्हा हा क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने बुद्धी कौशल्याचा वापर करून अत्यंत शिताफीने गुन्हेगारांचा शोध घेऊन अपहरण केलेल्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांची नावे गाव विचारले असता त्यांची नावे 1)महादेव एकनाथ सकाडे वय 37 वर्ष राहणार घोडका राजुरी तालुका जिल्हा बीड, 2)शोभा महादेव सकाडे वय 35 वर्षे राहणार घोडका राजुरी तालुका जिल्हा बीड,23) राजेंद्र महादेव सकाडे वय 21 वर्ष राहणार घोडका राजुरी तालुका जिल्हा बीड अशी सांगितले त्यानंतर आरोपींना मुलीला पळवून आणण्याचे कारण विचारले असता त्यांनी सदर मुलीच नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे तमाशा फडामध्ये विक्री करणार होते अशी कबुली दिली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष रोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार शाम्युअल कांबळे ,रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे ,सागर बाविस्कर, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे, सतीश श्रीवास, योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे, रमेश पैठणे ,महिला पोलीस अंमलदार चंद्रकला शडमल्लू सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.